IPL 2018 : आयपीएलमधल्या ' या ' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का...

आतापर्यंतच्या दहा हंगामातील ' या ' काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. त्यामुळे जाणून घ्या आयपीएलमधील या महत्वाच्या गोष्टी.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:07 PM2018-04-06T20:07:05+5:302018-04-06T20:07:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Do you know the 'things' in the IPL ... | IPL 2018 : आयपीएलमधल्या ' या ' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का...

IPL 2018 : आयपीएलमधल्या ' या ' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयपीएलचा नायक कोण, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर बरीच उत्तरं मिळतील. पण गेल्या दहा हंगामांचा विचार केला तर आयपीएलचा नायक ठरतो तो सुरेश रैना.

मुंबई : आयपीएलचे दहा हंगाम झाले, आता अकराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण आतापर्यंतच्या दहा हंगामातील ' या ' काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. त्यामुळे जाणून घ्या आयपीएलमधील या महत्वाच्या गोष्टी.

तीन जेतेपदे : आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक तीन जेतेपदे पटकावण्याचा मान मिळवला आहे तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने. रोहितने जेव्हा मुंबईची कमान सांभाळली होती, तेव्हा त्याच वर्षी त्याने संघाला जेतेपद मिळवून दिले होते.

सर्वाधिक विजय : आयपीएलमधील सर्वाधिक विजयही मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. आतापर्यंतच्या दहा मोसमांमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 92 विजय मिळवले आहेत.

 

आयपीएलचा नायक : आयपीएलचा नायक कोण, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर बरीच उत्तरं मिळतील. पण गेल्या दहा हंगामांचा विचार केला तर आयपीएलचा नायक ठरतो तो सुरेश रैना. आतापर्यंतच्या दहा हंगामामध्ये रैनाने सर्वाधिक झेलही (86) त्याच्याच नावावर आहेत.

धडाकेबाज फलंदाज : आयपीएलमधला सर्वात धडाकेबाज फलंदाज आहे तो ख्रिस गेल. कारण आतापर्यंत सर्वाधिक 263 षटकार गेलच्याच नावावर आहे. त्याचबरोबर सर्वाधिक पाच शतकेही त्यानेच झळकावली आहेत.

' बळी' राजा : आयपीएलमधला ' बळी' राजा ठरला आहे तो म्हणजे लसिथ मलिंगा. मुंबई इंडियन्सकडून खेळताना मलिंगाने भेदक मारा करत आतापर्यंत 154 बळी मिळवले आहेत.

Web Title: IPL 2018: Do you know the 'things' in the IPL ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.