ठळक मुद्देरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या झहीर खानने सौरव गांगुलीला बाद करत पहिला बळी मिळवला.
पहिला चेंडू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रवीण कुमारने कोलकाता नाईट रायडर्सच्या सौरव गांगुलीला आयपीएलमधला पहिला चेंडू टाकला होता.
निर्धाव षटक : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ग्लेन मॅग्राने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिले निर्धाव षटक टाकले होते.
हॅट्ट्रिक : चेन्नई सुपर किंग्जच्या लक्ष्मीपती बालाजीने 2008 साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पहिली हॅट्ट्रिक घेतली होती.
एका डावात पाच बळी : राजस्थान रॉयल्सच्या सोहेल तन्वीरने ( 11 धावांत 6 बळी) चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना बाद केले होते.
बळी मिळवणारा गोलंदाज : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या झहीर खानने गांगुलीला बाद करत पहिला बळी मिळवला.
पाच विकेट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज : चेन्नईकडून खेळणाऱ्या लक्ष्मीपती बालाजीने (5-24) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ही कामगिरी केली होती.
सुपर ओव्हर : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील 2009च्या मोसमात पहिली सुपर ओव्हर टाकली गेली होती.
आयपीएलमध्ये पहिले दीडशतक, शतक, अर्धशतक, षटकार आणि चौकार ठोकणारा एकच फलंदाज आहे आणि तो म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा ब्रेंडन मॅक्युलम.
बाद होणारा फलंदाज : कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा सौरव गांगुली हा आयपीएलमध्ये बाद झालेला पहिला फलंदाज ठरला होता.
धावचीत : कोलकाताच्या अजित आगरकर आणि वृद्धिमान साहा यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अॅश्ले नॉफ्केला धावचीत केले होते.
फ्री-हिट खेळणार फलंदाज : चेन्नई सुपर किंग्जच्या मॅथ्यू हेडनला पहिला फ्री-हिट चेंडू खेळायला मिळाला.
झेल टिपणारा क्षेत्ररक्षक : बंगळुरुच्या जॅक कॅलिसने गांगुलीला झेलबाद केले होते.
शतकी भागीदारी : दिल्लीच्या गौतम गंभीर आणि शिखर धवन यांनी राजस्थानविरुद्ध 112 धावांची भागीदारी रचली होती.
विजेतेपद : राजस्थान रॉयल्सच्या संघाने 2008 साली आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले होते.
पर्पल कॅप : सोहेल तन्वीर.
ऑरेंज कॅप : शॉन मार्श.
सर्वोत्तम क्रिकेटपटू : शेन वॉटसन.
सामनावीर : ब्रेंडन मॅक्युलम.
Web Title: IPL 2018: First Time in IPL ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.