ठळक मुद्देदिल्ली डेअरडेव्हिल्सला एकदाही जेतेपद जिंकता आलेले नाही, त्यामुळे गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा हा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने हा आपला आयपीएलचा अखेरचा मोसम असून त्यानंतर आपण निवृत्ती पत्करणार असल्याचे जाहीर केले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सला जेतेपद मिळवून दिल्यावर मला आयपीएलला अलविदा करायला आवडेल, असे गंभीरने म्हटले आहे.
आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद गंभीरकडेच होते. पण त्यावेळी गंभीरला या पदाला न्याय देता आला नव्हता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने गंभीरला आपल्या संघात सामील करून त्याच्याकडे नेतृत्व सोपवले. कोलकात्याची धुरा वाहताना गंभीरने दोन वेळा संघाला जेतेपद जिंकवून दिले होते. पण आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्सला एकदाही जेतेपद जिंकता आलेले नाही, त्यामुळे गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा हा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
याबाबत गंभीर म्हणाला की, " ज्या संघातून मी आयपीएलची सुरुवात केली, तिथूनच माझ्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला, असे मला वाटते. पण जेतेपदासह मला आयपीएलला अलविदा करायचा आहे. फक्त कर्णधाराच्या जोरावर जेतेपद पटकावता येत नाही, तर संघात चांगले खेळाडू असावे लागतात आणि त्यांच्याकडून दमदार कामगिरी व्हावी लागते. सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ चांगलाच समतोल आहे, त्यामुळे यावेळी आम्हीच जेतेपदाचे मानकरी ठरू, असा विश्वास मला आहे. "
Web Title: IPL 2018: Gautam Gambhir will goodbye IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.