Join us  

IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? दोन दिवसांत होणार निर्णय

आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 3:17 PM

Open in App
ठळक मुद्देराजस्थानचा संघ दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्यांना आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही.

नवी दिल्ली : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्‍टीवन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार या पदावरुन उचलबांगडी केली आहे. आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे. 

राजस्थानच्या संघाचे कार्यकारी अधिकारी रणजित बरठाकूर यांनी याबाबत म्हटले आहे की, " दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई करण्यात आली. आता आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत आहोत."

राजस्थानचा संघ दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्यांना आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे बीसीसीआय नेमका काय निर्णय घेते, याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राजस्थानच्या संघाने स्मिथची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.

टॅग्स :आयपीएल 2018चेंडूशी छेडछाडस्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर