- अयाझ मेमनसंपादकीय सल्लागार
७ एप्रिलपासून सुरु होत असलेल्या आयपीएलच्या धडाक्याकडे जगभरातील क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. एकाच वेळी जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने गेल्या दशकभरापासून कायम असलेली उत्सुकता यंदा त्याहून अधिक शिगेला पोहचली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, जसप्रीत बुमराह या दिग्गजांसह १९ वर्षांखालील युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकूणंच यंदाच्या सत्रामध्ये कोणत्या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार याचे विशेष रिपोर्ट कार्ड जेष्ठ क्रिकेट समिक्षक अयाझ मेमन यांनी खास ‘लोकमत’साठी मांडले आहे.धडाकेबाज फलंदाजविराट कोहली : संपूर्ण स्पर्धेत कोहली आकर्षणाचे केंद्र असेल यात शंकाच नाही. गेल्या काही महिन्यांत झालेल्या क्रिकेटच्या सर्व प्रकारांच्या मालिकांमध्ये कोहली लक्षवेधी ठरला. श्रीलंका दौºयात कोहली खेळला नाही, पण आता पुन्हा आपला दबदबा राखण्यास तो सज्ज झाला आहे.एबी डिव्हिलियर्स : धडाकेबाज फलंदाज असलेला डिव्हिलियर्स यशसाठी कायम भुकेला असतो. त्याने आपल्या खेळीतून हे सिद्धही केले आहे. एक फलंदाजी जोडी म्हणून डिव्हिलियर्स आणि कोहली यंदाची आयपीएल नक्की गाजवतील.रोहित शर्मा : जेव्हा रोहित फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो सर्वात धोकादायक आणि आकर्षक फलंदाज असतो. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका दौºयात रोहितने कमी धावा केल्या असल्या, तरी आता त्याची सरासरी पाहून प्रतिस्पर्धी संघांवर नक्कीच दडपण येईल.शिखर धवन : विध्वंसक फलंदाज असलेला धवन फॉर्ममध्ये असेल, तर कोणत्याही आक्रमणाचा धुव्वा उडवू शकतो. आता वॉर्नरच्या अनुपस्थितीमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी आघाडीच्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे दडपण त्याच्यावर असेल.मनिष पांड्ये : लक्षवेधी किंमत (रु. ११ करोड) मिळाल्यानंतर मनिषकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष लागले आहे. इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याच्या कामगिरीविषयी उत्सुकता लागली आहे. सनरायझर्सला मनिषकडून मधल्या फळीला बळकटी देण्यासह उत्कृष्ट फिनिशिंगचीही अपेक्षा आहे.तुफानी गोलंदाजकागिसो रबाडा : माझ्या मते आजच्या काळातील हा सर्वोत्तम गोलंदाज आहे. याआधीही रबाडा आयपीएलमध्ये खेळला आहे, पण यावेळी रबाडा एक वेगळा लौकिक घेऊन खेळेल. तो दबाव आणि अपेक्षा कशाप्रकारे पेलतो हे पहावे लागेल.पॅट कमिन्स : यंदाच्या सत्रात माझ्यामते आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कमिन्स आघाडीचा आॅसी गोलंदाज ठरला आहे. बिनधास्तपणे वेगवान गोलंदाजी करणाºया कमिन्सच्या माºयात अनिश्चितता आहे. बुमराह, मुस्तफिझूर आणि हार्दिक पांड्या यांच्यासह कमिन्सच्या सहभागाने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा ताफा मजबूत बनला आहे.मुस्तफिझूर रहमान : वयवर्ष केवळ २२, पण आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम डेथ ओव्हर्स गोलंदाजांमध्ये याची गणना होते. गोलंदाजीतील वैविध्यता आणि जबरदस्त वेग यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा बांगलादेशचा चमकदार गोलंदाज ठरला आहे.राशिद खान : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेण्याचा विक्रम नोंदवलेला हा अफगाणिस्तानचा लेग स्पिनर सध्या क्रिकेटविश्वात लक्षवेधी ठरत आहे. गतवर्ष राशिदसाठी अत्यंत यशस्वी ठरले. फलंदाजांना नेटाने गोलंदाजी करणे त्याच्यापुढे आव्हानात्मक असेल. तसेच प्रशिक्षकांनाही त्याचा खेळ समजून घ्यावे लागेल.जयदेव उनाडकट : अत्यंत गुणवान असूनही जयदेव भारतीय संघात पक्के स्थान मिळवू शकला नाही. मनिष पांडेप्रमाणेच यालाही मोठी रक्कम (रु. ११.५ करोड) मिळाली. मिळालेल्या किंमतीनुसार अपेक्षित कामगिरी करण्याचे दडपणही जयदेववर असेल.शानदार अष्टपैलूबेन स्टोक्स : लिलावामध्ये स्टोक्स महागडा का ठरला हे सांगण्याची फारशी गरज नाही. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्टोक्सची गणना होत असून गतमोसमात त्याने पुणे संघाकडून आपली छाप पाडली. यंदाच्या सत्रात तो बंदीच्या कारवाईनंतर पुनरागमन करत असून यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याने जास्त गोलंदाजीही केलेली नाही.आंद्रे रसेल : कोलकाता नाइट रायडर्सने कायम ठेवलेल्या आपल्या दोन खेळाडूंपैकी रसेल एक आहे. आक्रमक फलंदाजी आणि तेवढीच दमदार गोलंदाजी, तसेच डेथ ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करण्याची असलेली क्षमता यामुळे तो फ्रेंचाइजी आणि चाहत्यांचा आवडता खेळाडू आहे.कृणाल पांड्या : कृणाल पांड्या दमदार डावखुरी फिरकी गोलंदाजी करण्यासोबतच आक्रमक फलंदाजी करत असल्याने तो देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूपैकी एक आहे. गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केल्याने त्याच्या नावाचा विचार भारतीय संघासाठीही होऊ लागला आहे.हार्दिक पांड्या : तुफानी फलंदाजी करण्यासह वेगवान व चतुर गोलंदाजी करण्यात हातखंडा असलेला हार्दिक भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे. यंदा आंतरराष्ट्रीय सत्रात अपेक्षित कामगिरी झाली नसली, तरी ही कसर आयपीएलमध्ये भरुन काढण्यास तो सज्ज आहे.रवींद्र जडेजा : आयपीएलमध्येच गवसलेला हा खेळाडू भारतीय संघाचा अविभाज्य भाग असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात याने छाप पाडली आहे. आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाच्या जोरावर पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य जडेजाने बाळगले आहे.उत्साही युवा खेळाडूपृथ्वी शॉ : जबरदस्त युवा फलंदाज असलेल्या पृथ्वीसाठी गेले काही महिने शानदार ठरले. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजेत्या भारतीय संघाचे चमकदार नेतृत्त्व केलेल्या पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी काही धमाकेदार शतकी खेळी केल्या. दिल्लीने त्याची चांगली निवड केली आहे.मनोज कार्ला : १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात मनोजने भारतीय संघासाठी निर्णायक शतक ठोकले. दिल्लीसंघात तो संघ सहकारी पृथ्वी आणि भारतीय युवा संघातील माजी खेळाडू रिषभ पंतसह शानदार खेळ करेल. यंदाचे सत्र या युवा खेळाडूसाठी महत्त्वाचे ठरेल.शुभमान गिल : १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज म्हणून शुभमानने लक्ष वेधले. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रेंचाइजीमध्ये चढाओढ झाली. अखेर कोलकाताने बाजी मारत शुभमानचा समावेश आपल्या संघात केला.कमलेश नागरकोटी : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सातत्याने १४० किमी वेगाने मारा करत कमलेशने सर्वांनाच चकीत केले. भारताच्या वेगवान गोलंदाजीचा भविष्य म्हणून लौकिक मिळाल्यानंतर कोलकाताने त्याला आपल्या संघात स्थान दिले.अनुकुल रॉय : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्यात संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावलेल्या अनुकुलने संपूर्ण स्पर्धेत चतुराईने आणि अप्रतिम नियंत्रित मारा केला. युवा खेळाडूंवर भर दिलेल्या मुंबई इंडियन्सने त्याला सहजपणे आपल्याकडे खेचून घेतले.दमदार कर्णधारमहेंद्रसिंग धोनी : दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करत असलेल्या सीएसकेला पुन्हा एकदा कर्णधार धोनी आपल्या मॅजिकच्या जोरावर जेतेपद मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. सीएसकेने खेळलेल्या आठ सत्रांमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात दोनवेळा जेतेपद उंचावले आहे. शिवाय आपल्या फलंदाजीवर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासही धोनी सज्ज झाला आहे.रविचंद्रन आश्विन : यंदाच्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आश्विनपुढे आपले नेतृत्त्वकौशल्य सिद्ध करण्याचे प्रमुख आव्हान आहे. त्याचबरोबर आपण अजूनही देशाचे अव्वल फिरकीपटू असल्याचेही त्याला सिद्ध करायचे आहे.गौतम गंभीर : कोलकाताला दोन जेतेपद मिळवून दिल्यानंतरही संघाने त्याला रिटेन केले नाही. यंदा तो आपल्या दिल्ली संघात परतला असून यामुळे संघाला हक्काचा खेळाडू मिळाला आहे. त्याला यंदाच्या सत्रात नव्या दमाच्या खेळाडूंसह विजयी कामगिरी करायची आहे. त्याचबरोबर त्याला आघाडीवर राहून धावाही करायचे आहेत.विराट कोहली : क्रिकेटच्या प्रत्येक स्तरावर हा खेळाडू जबरदस्त यशस्वी ठरला आहे. यामध्ये आरसीबीकडून खेळताना आयपीएल चषक उंचावण्यात आलेले अपयश हे एकमेव अपवाद आहे. तरी काही सत्रांमध्ये चमकदार कामगिरी करत आरसीबी संघ जेतेपदाच्या नजीकही पोहचला होता, पण मोक्याच्यावेळी त्यांना यश मिळवता आले नाही. त्यामुळे आयपीएलमधील ‘चोकर्स’ संघ अशी ओळखही त्यांची झाली आहे. हेच अपयश धुवून काढण्याचे आव्हान कोहलीपुढे आहे.अजिंक्य रहाणे व केन विलियम्सन : राजस्थानचा कर्णधार अजिंक्य व हैदराबादचा कर्णधार विलियम्सन यांच्यापुढे अनुक्रमे स्मिथ व वॉर्नर यांच्या अनुपस्थित यशस्वी नेतृत्त्व करण्याचे मुख्य आव्हान आहे.