Join us  

MI v RR IPL 2018 : बटलरची तुफानी खेळी, राजस्थानचा रॉयल विजय, मुंबईचा सात विकेटने पराभव

मुंबई वि. राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 7:36 PM

Open in App

रोहित नाईकमुंबई : आक्रमक सलामीवीर जोस बटलरच्या (९४*) तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ गड्यांनी पराभव केला. यासह राजस्थानने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवताना प्लेआॅफच्या आशा कायम राखल्या. मुंबईची सहाव्या स्थानी घसरण झाली असून पुढील वाटचाल बिकट बनली आहे. मुंबईने दिलेल्या १६९ धावांचे आव्हान राजस्थानने केवळ १८ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १७१ धावा करून पार केले.वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईकरांनी २० षटकांत ६ बाद १६८ धावांची समाधानकारक मजल मारली. आक्रमक सुरुवातीनंतर मोक्याच्या वेळी राजस्थानने दिलेल्या धक्क्यामुळे मुंबईकरांना मोठी धावसंख्या गाठता आली नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात डी अ‍ॅर्ची शॉर्टच्या (४) रुपाने राजस्थानला धक्का बसला. मात्र, जोस बटलरने अखेरपर्यंत खिंड लढवताना ५३ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ९४ धावांचा विजयी तडाखा दिला. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बटलरने सावध सुरुवात करताना खेळपट्टीचा अंदाज घेतला. जम बसल्यानंतर मात्र त्याने चौफेर फटकेबाजी करताना मुंबईकरांना चोपले. त्याचवेळी संपूर्ण मोसमात लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने मोक्याच्या वेळी फॉर्म मिळवताना ३६ चेंडूंत ४ चौकारांसह ३७ धावा केल्या. बटलर - रहाणे यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. हार्दिक पंड्याने रहाणेला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर संजू सॅम्सनने बटलरला अप्रतिम साथ देताना १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा कुटल्या. हार्दिकने त्याला बाद केले खरे, पण पुढच्याच चेंडूवर बटलरने षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी, एविन लेविस (६०), सूर्यकुमार यादव (३८) आणि हार्दिक (३६) यांच्या जोरावर मुंबईने समाधानकारक मजल मारली. सूर्यकुमार - लेविस यांनी १०.४ षटकांत ८७ धावांची शानदार सलामी दिल्यानंतरही मधली फळी कोलमडल्याने मुंबईला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. जोफ्रा आर्चरने ११ व्या षटकात सूर्यकुमार व कर्णधार रोहित शर्मा यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून मुंबईच्या वेगवान धावसंख्येला ब्रेक लावला. यानंतर लेविसने आक्रमक पवित्रा घेत अर्धशतक झळकावले खरे, परंतु त्याला दुसºया टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. लेविसने ४२ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह आपली खेळी सजवली.धवल कुलकर्णीने त्याला बाद केल्यानंतर इशान किशन (१२), कृणाल पंड्या (३) झटपट परतले. हार्दिकने आक्रमक फटके मारत २१ चेंडंूत ३ चौकार व २ षटकारांसह ३६ धावा केल्याने मुंबईला समाधानकारक मजल मारता आली. आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला रोखले. 

मुंबई वि. राजस्थान LIVE : 

11:33PM - राजस्थानचा सात विकेटने विजय, बटलरची 92 धावांची दमदार खेळी

11:30PM - राजस्थानला विजयासाठी 18 चेंडूत 16 धावांची गरज

11:08PM - राजस्थानला दुसरा धक्का, रहाणे बाद

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे 37 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात झाला बाद. राजस्थानला विजयासाठी 40 चेंडूत 64 धावांची गरज

11.00 बटलरची अर्धशतकी खेळी; राजस्थानची विजयाकडे आगेकूच

10.52 रहाणे आणि बटलरची चिवट खेळी; 11 षटकांत 1 बाद 86 धावा

10.31  राजस्थानचे अर्धशतक पूर्ण 

10.26 रहाणे आणि बटलरने राजस्थानचा डाव सावरला; पाच षटकांत 44 धावा

10.08 पहिल्याच षटकात बुमराहचा भेदक मारा;  शॉर्ट 4 धावांवर माघारी

 9.51 मुंबई इंडियन्सकडून राजस्थानपुढे विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य

 9.51 अखेरच्या षटकांत मुंबई इंडियन्सच्या 18 धावा

 9.51 हार्दिक पांड्या 36 धावांवर बाद; संजू सॅमसनचा फ्लाईंग कॅच

9.44  हार्दिक पांड्याची फटकेबाजी; 18 व्या षटकात कुटल्या 19 धावा

9.43 हार्दिक पांड्याच्या 16 चेंडूत 31 धावा

9.33 मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी; कृणाल पांड्या तीन धावा करून माघारी 

9.17 ईशांत किसन 12 धावांवर बाद, मुंबई इंडियन्स 4 बाद 119

9.11 मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या; इविन लुईस 60 धावांवर माघारी

9.05  12.2 षटकांत मुंबईच्या 100 धावा पूर्ण; इविन लुईसवर संघाची भिस्त

9.03  इविन लुईसचे अर्धशतक पूर्ण; 37 चेंडूत 52 धावा

8.57 मुंबईला सलग दुसरा धक्का; रोहित शर्मा शून्य धावांवर बाद

8.56 सूर्यकुमार यादवच्या 31 चेंडूत 38 धावा

8.56  मुंबईला पहिला धक्का; सूर्यकुमार यादव आर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद

8.53 सूर्यकुमार-लुईसची जोडी सेट; मुंबईच्या 10 षटकांत 86 धावा

8.45 सूर्यकुमार पाठोपाठ लुईसचीही फटकेबाजी; श्रेयस गोपालच्या एकाच षटकात खेचले दोन षटकार

8.31 मुंबईने 6 षटकांत ओलांडला 50 धावाचा टप्पा; सूर्यकुमार यादव आणि लुईसची ठराविक अंतराने फटकेबाजी

8.25 पहिल्या पाच षटकांत मुंबईच्या बिनबाद 40 धावा

8.20 सूर्यकुमार यादवकडून चौकारांची बरसात; 15 चेंडूत 22 धावा8.12 इविन लुईसला 5 धावांवर जीवनदान; स्टुअर्ट बिन्नीने सोडला झेल8.12 इविन लुईसला 5 धावांवर जीवनदान; स्टुअर्ट बिन्नीने सोडला झेल8.04 मुंबईची शानदार सुरुवात; पहिल्या षटकात तीन चौकारांसह 14 धावा8.01 सूर्यकुमार यादवची पहिल्याच षटकात फटकेबाजी; सलग दोन चौकार8.00 मुंबई व राजस्थान रॉयल यांच्यातील सामन्याला सुरुवात

 

 

7.30 राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून स्वीकारले क्षेत्ररक्षण 

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेट