ठळक मुद्देआयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट 50 ऐवजी 30 कोटी रुपयांवर आणण्यात आले आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांची अदाकारी पाहता येणार नाही.
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात लेडी गागा, कॅट पेरी आणि ब्रायन अॅडम्ससारखे नावाजलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आपली अदाकारी पेश करणार, असे म्हटले जात होते. पण आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला सध्या कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे या कलाकारांची अदाकारी यावेळी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात पाहता येणार नाही.
याबाबत आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, " आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही विदेशी कालाकारांना या सोहळ्यात सामील करून घेऊ शकत नाही. पण बॉलीवूडचे काही कलाकार या सोहळ्यामध्ये आपली अदाकारी पेश करणार आहेत. "
उद्घाटन सोहळ्याचे बजेट कितीने घटले
यापूर्वी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 50 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. पण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने या गोष्टीला आक्षेप घेतला होता. त्यामुळे आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट 50 ऐवजी 30 कोटी रुपयांवर आणण्यात आले आहे.
Web Title: IPL 2018: Sculpture for the budget of the inaugural IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.