मुंबई- विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंन्जर्स बँगळुरू हा संघ सोमवारच्या सामन्यानंतर आयपीएलमधून बाहेर गेल्याच जवळपास निश्चित झालं आहे. विराटसेनेसाठी आयपीएलमधील आत्तापर्यतचे सामने फारसे चांगले नव्हते. प्लेऑफपर्यंतही संघ पोहचू शकला नाही. आरसीबीच्या सध्या चार मॅच बाकी आहेत पण आयपीएलमध्ये टिकण्यासाठी लागणारे 16 अंक हे टीमला चार मॅच जिंकल्यानंतरही मिळणार नाहीत. त्यामुळे टीमची प्लेऑफमधील एन्ट्री अशक्य झाली आहे. जाणून घ्या आरसीबीच्या विजयाची पाच महत्त्वाची कारणं.
- बॉलर्सची खराब कामगिरी
आरसीबीच्या बॉलर्सनी या सिजनमध्ये विशेष कामगिरी केली नाही. उमेश यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांशिवाय इतर कुठल्याही बॉलरने चांगली केली नाही. कॅप्टन विराट कोहलीही बॉलर्सच्या खेळीवर नाराज होता. टॉप 10मध्ये आरसीबीचा फक्त एकच बॉलर सहभागी होता. उमेश यादवने 10 सामन्यात 14 विकेट घेतल्या.
- मोठे स्टार्स ठरले फ्लॉप
बंगळुरूच्या टीममध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डिकॉक, ब्रेंडन मॅकुलम असे दिग्गद खेळाडू होते. तरीही टॉप 10 बॅट्समॅनमध्ये फक्त विराट कोहलीचं नाव होते. 10 सामन्यात त्याने 396 रन्स केले.
- ब्रेंडन मॅकुलम ठरला फ्लॉप
ब्रेंडन मॅकुलम त्याच्या बॅटिंग स्टाइलने ओळखला जातो. पण ती शैली आयपीएलमध्ये खेळताना कुठेही दिसली नाही. 2008 सालच्या आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात 158 रन्स करणारा ब्रेंडन या सामन्यात फ्लॉप ठरला. 6 सामन्यात 21च्या सरासरीने त्याने फक्त 127 रन्स केले.
- महत्त्वाचे सामने हातचे घालवले
सुरूवातीच्या सामन्यात टीमला डिव्हिलिअर्सचा पाठिंबा नीट मिळाला नाही. डिव्हिलिअर्स फीट होऊन आल्यावर महत्त्वाच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरोधातील सामन्यात त्याने 5 आणि त्याआधीच्या चेन्नईविरोधातील सामन्यात 1 धाव करून तो बाद झाला.
- टीममधील सततचे बदल
आरसीबीने संघात सतत बदल केले. उदा. हैदराबादच्याविरोधातील सामन्यात मोइन अलीला खेळवण्याचा कुठलाही फायदा संघाला झाला नाही.
Web Title: IPL 2018- why royal challengers bangalore out of play off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.