मोहाली - आयपीएलचा रणसंग्राम सुरु होण्या पूर्वी युवराज सिंगने धुवांदार शतक ठोकत प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने काल सराव सामन्यात सहभाग नोदंवला होता. या सामन्यात युवराजने तुफानी फलंदाजी करताना 12 षटकांरासह 125 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने युवराजने मैदानावर सर्वच बाजूने फटके मारले.
षटकार किंग युवराजने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला या खेळीद्वारे इशाराच दिला आहे. युवराज फलंदाजी करत असताना पत्नी हेजल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. पत्नी हेजलला पाहताच युवराजने षटकार मारला. हेजलने सोशल मीडियावर युवराजच्या षटकाराचा फोटो पोस्ट केला आहे.
(आयपीएल 11चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर....)
यंदाच्या आयपीएलमध्ये युवराज पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघाकडून - किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू असलेल्या युवराजला यंदाच्या मोसमात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बेस प्राईसला म्हणजे फक्त २ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. २००८ साली आयपीएलच्या पहिल्या मोसमात युवराजने किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले होते. त्यावेळी पंजाबचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता.
(आणखी वाचा - का खालसा होतंय आयपीएलमधील युवी'राज'?)
असा आहे पंजाब संघ - अक्षर पटेल (6.75 कोटी), रविचंद्रन अश्विन (7.6 कोटी ), युवराज सिंह (2 कोटी), करुण नायर (5.6 कोटी), लोकेश राहुल (11 कोटी), डेविड मिलर (3 कोटी), एरॉन फिंच (6.2 कोटी), मार्कस स्टोइनिस (6.2 कोटी), मयंक अग्रवाल (1 कोटी), अंकित सिंह राजपूत (3 कोटी), एंड्रू टाई (7.2 कोटी), मुजीब जादरान (4 कोटी), मोहित शर्मा (2.4 कोटी, राइट टू मैच), बरिंदर सरां (2.2 कोटी), क्रिस गेल (2 कोटी), बेन ड्वौर्शुइस (1.4 कोटी), अक्षदीप नाथ (1 कोटी), मनोज तिवारी (1 कोटी), मंजूर डार, प्रदीप साहू, मयंक डागर (20-20 लाख)