IPL 2019: अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video 

IPL 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर यांच्यातील मांकड प्रकरण चांगलेच गाजले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:04 PM2019-04-09T14:04:36+5:302019-04-09T14:05:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : Avoiding Mankad dismissal? David Warner cautious versus R Ashwin, Video | IPL 2019: अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video 

IPL 2019: अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर यांच्यातील मांकड प्रकरण चांगलेच गाजले. अश्विनने मांकड नियमानुसार धावबाद करण्यापूर्वी बटलरला एक ताकीद द्यायला हवी होती, असा सल्ला अनेकांनी दिला. पण, अश्विनने आपण नियमाचे उल्लंघन न केल्याचा दावा केला. या प्रकरणानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर नॉन स्ट्राईक एंडला असलेला प्रत्येक फलंदाज काळजी घेताना दिसत आहे. याची प्रचिती पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यातही आली. अश्विनला मांकड धावबाद करण्याची संधी मिळू नये यासाठी हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चक्क एक शक्कल लढवली.

अश्विन गोलंदाजी करत असताना वॉर्नरने क्रिजमध्येच राहण्याची पुरेपूर काळजी घेतली. त्याचे ही शक्कल कॅमेरात कैद झाली. 

पाहा व्हिडीओ...


दरम्यान, अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने रोमहर्षक विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेट्सने पराभव केला. अखेरच्या तीन षटकात हैदराबादने भेदक मारा करताना सामना रोमांचक स्थितीत आणला. परंतु, सलामीवीर लोकेश राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहताना 71 धावांचा तडाखा देत पंजाबच्या विजयावर शिक्का मारला. यासह पंजाबने 8 गुणांची नोंद करताना तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाबने हैदराबादला ४ बाद १५० धावांत रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतरही पंजाबची घसरगुंडी झाली. मात्र राहुलच्या संयमी अर्धशतकामुळे त्यांनी एक चेंडू राखून रोमांचक विजय मिळवला. पंजाबने १९.५ षटकात ४ बाद १५१ धावा केल्या. अखेरच्या तीन षटकात पंजाबला १९ धावांची गरज असताना संदीप शर्माने १८व्या षटकात मयांक अग्रवाल व डेव्हिड मिल्लर यांना बाद करुन पंजाबची ३ बाद १३५ अशी अवस्था केली. यानंतर मोहम्मद नाबीने मनदीप सिंगला बाद करुन पंजाबवरील दबाव आणखी वाढवले. मात्र, राहुलने अतिरिक्त दडपण न घेता पंजाबच्या हातातील सामना निसटू दिला नाही. ख्रिस गेल (१६) झटपट परतल्यानंतर मयांकने ४३ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा करुन राहुलसह दुसऱ्या गड्यासाठी ११४ धावांची निर्णायक भागीदारी केली.

Web Title: IPL 2019 : Avoiding Mankad dismissal? David Warner cautious versus R Ashwin, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.