Join us  

IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव

चेन्नई,  आयपीएल 2019  : 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 3:25 PM

Open in App

06 Apr, 19 07:46 PM



 

06 Apr, 19 07:20 PM

पण, या दोघांना चेन्नईच्या गोलंदाजांनी मोठे फटके मारण्यापासून रोखले. त्यामुळे चेंडू व धावांचे अतंर वाढले. त्याच दडपणात राहुल विकेट देऊन बसला. त्याने 47 चेंडूंत 55 धावा केल्या. त्यात 1 षटकार व तीन चौकार होते. 

06 Apr, 19 07:14 PM

सर्फराज आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सर्फराजने 43 चेंडूंत 51 धावा केल्या, तर राहुलने 42 चेंडूंत 51 धावा केल्या.

06 Apr, 19 07:11 PM

2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. यावेळी लोकेश राहुलला नशिबाची साथही मिळाली. 

06 Apr, 19 07:00 PM

13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला अपयश आले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही. नशीबाचे पारडे राहुलच्या बाजूने झुकले होते. 

06 Apr, 19 06:48 PM

सर्फराज आणि राहुल यांच्या संयमी खेळीने पंजाबने 10 षटकांत 2 बाद 71 धावा केल्या. त्यात राहुलच्या 36, तर सर्फराजच्या 29 धावा होत्या. 

06 Apr, 19 06:40 PM

राहुल व सर्फराज या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पंजाबला मजबूत स्थिती मिळवून दिली. 

06 Apr, 19 06:24 PM

त्यानंतर लोकेश राहुल व सर्फराज खान यांनी सावध खेळ केला. पंजाबने पाच षटकांत 2 बाद 35 धावा केल्या. 
 

06 Apr, 19 06:12 PM

पंजाबला अवघ्या 7 धावांवर 2 झटके बसले. ख्रिस गेल व लोकेश राहुल समोर असतानाही चेन्नईचा कर्णधार धोनीनं दुसरे षटक हरभजन सिंगला टाकण्यासाठी बोलावले. भज्जीनं हा निर्णय सार्थ ठरवताना गेल व मयांक अग्रवालला बाद केले. 

06 Apr, 19 06:08 PM



 

06 Apr, 19 05:49 PM



 

06 Apr, 19 05:14 PM



 

06 Apr, 19 05:13 PM

अश्विनने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट घेतल्या. 

06 Apr, 19 05:08 PM

पुढच्याच चेंडूवर सुरेश रैनालाही अश्विनने त्रिफळाचीत केले. रैनाने 20 चेंडूंत 17 धावा केल्या. 

06 Apr, 19 05:06 PM

अश्विनने त्याला माघारी पाठवले. ड्यू प्लेसिस 38 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा करत माघारी परतला.

06 Apr, 19 05:01 PM



 

06 Apr, 19 05:01 PM

ड्यू प्लेसिसने 33 चेंडूंत 50 धावा केल्या, त्यात 2 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. 

06 Apr, 19 04:53 PM

पहिल्या सहा षटकांत 54 धावा करणाऱ्या चेन्नईला पुढील 4 षटकांत केवळ 18 धावाच करण्यात यश आले. 



 

06 Apr, 19 04:50 PM

 वॉटसन बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली. त्यांना 10 षटकांत 1 बाद 71 धावाच करता आल्या. 
 

06 Apr, 19 04:39 PM

आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विनने चेन्नईचा सलामीवीर वॉटसनला माघारी पाठवले. वॉटसनने 24 चेंडूंत 26 धावा केल्या आणि त्यात 3 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. 
 

06 Apr, 19 04:30 PM

वॉटसन आणि ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6 षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. 

06 Apr, 19 04:28 PM

सॅम कुरनच्या उजव्या खांद्यावर दुखापत, शेन वॉटसनने मारलेला चेंडू झेल करण्याच्या प्रयत्नात दुखापत...

06 Apr, 19 04:24 PM

अँड्य्रू टायच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंत शेन वॉटसनने 11 धावा चोपल्या. त्यात ड्यू प्लेसिसनेही 7 धावा काढल्या. चेन्नईने पाच षटकांत 47 धावा केल्या. 

06 Apr, 19 04:14 PM

शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सावध सुरुवात करताना चेन्नईची धावगती हळुहळू वाढवली. 

06 Apr, 19 04:01 PM



 

06 Apr, 19 03:54 PM



 

06 Apr, 19 03:47 PM



 

06 Apr, 19 03:46 PM

महेंद्रसिंग धोनी आज चेन्नई सुपर किंग्सकडून 150 वा सामना खेळणार आहे. सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 

06 Apr, 19 03:42 PM

चेन्नई सुपर किंग्स - शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, स्टॉट कुगेलेजन, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर

06 Apr, 19 03:40 PM

किंग्स इलेव्हन पंजाब - आर अश्विन, लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम कुरन, अँड्य्रू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी

06 Apr, 19 03:38 PM

अश्विनची चाहत्यांना भावनिक साद - हा सामना माझ्यासाठी भावनिक आहे. घरच्या चाहत्यांना माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मी खात्री देतो की त्यांना निराश करणार नाही. 



 

06 Apr, 19 03:36 PM

चेन्नईच्या संघात तीन बदल - शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा आणि ड्वेन ब्राव्हो यांना विश्रांती. स्कॉट कुगेलजन, हरभजन सिंग व फॅफ ड्यू पेलिस यांना संधी



 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाबड्वेन ब्राव्होमहेंद्रसिंग धोनी