ठळक मुद्देआयपीएल 2019 लीग 23 मार्चपासून सुरूभारतीय खेळाडूंना केवळ दहा दिवसांची विश्रांतीझिम्बाब्वे एक कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार?
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) नुकतेच इंडियन प्रीमिअर लीग 23 मार्चपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी लीगमुळे झिम्बाब्वेचा भारत दौरा अडचणीत आला आहे. लोकसभा निवडणूकांमुळे यंदा आयपीएल स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच कालावधीत झिम्बाब्वे भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करावा लागेल किंवा वेळापत्रक बदलावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
झिम्बाब्वे भारत दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 1-0 अशा आघाडीवर आहे. ही मालिका 18 जानेवारीला संपणार आहे आणि त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ पाच वन डे आणि तेन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात पुन्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. 24 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि 5 वन डे सामने खेळणार आहे .
या मालिकेनंतर खेळाडूंना केवळ दहा दिवसाची विश्रांती मिळणार आहे. याच दहा दिवसात झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळावी लागणार आहे. आयपीएल लवकर होणार असल्याने हा पेच निर्माण झाला आहे आणि त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची मालिका रद्द केली जाऊ शकते. याबाबत झिम्बाब्वे क्रिकेट संघटना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात चर्चा करणार आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंना अधिक सराव मिळावा म्हणून या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. 2002 नंतर प्रथमच झिम्बाब्वे भारतात द्विदेशीय मालिका खेळणार होते. झिम्बाब्वे संघ 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने शेवटचा भारताता आला होता. त्यापूर्वी 2011 वर्ल्ड कप आणि 2006च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी झिम्बाब्वेच्या संघाने भारत दौरा केला होता.
Web Title: IPL 2019 schedule puts Zimbabwe's tour of India in March in doubt
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.