इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. MIनं यापूर्वी पाचपैकी चार वेळा ( २०१० वगळता) आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबईची ही घोडदौड दिल्ली रोखेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाला रोखण्यासाठी MIकर्णधार रोहित शर्मानं संघात बदल करून मोठा डाव खेळला. आता तो यशस्वी होतो की नाही, ते निकालाअंती कळेल.
दुबईतील स्टेडियमवर संघांची कामगिरी
मुंबई इंडियन्स - ७ सामने, २ विजय, ५ पराभव
दिल्ली कॅपिटल्स - १० सामने, ५ विजय, ५ पराभव
Head to head overall:
एकूण सामने २७, मुंबई ईंडियन्स १५ विजयी, दिल्ली कॅपिटल्स १२ विजय
Delhi Capitals XI: शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायर, रिषभ पंत, अक्षर पटेल, प्रविण दुबे, कागिसो रबाडा, आर अश्विन, अॅनरिच नॉर्ट्झे
- राहुल चहर OUT, जयंत यादव IN
Mumbai Indians XI : क्विंटन डी'कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जयंत यादव, नॅथन कोल्टर-नायल, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
राहुल चहरला संघाबाहेर ठेवण्याच्या रोहितच्या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले. राहुलनं यंदाच्या आयपीएलमध्ये १५ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत. रोहित शर्मा म्हणाला,''खरं सांगायचं तर मीच कन्फ्युज होतो. त्यामुळे नाणेफेक गमावल्याचा एवढा फरक पडणार नाही. आणखी एक फायनल खेळतानाचा अभिमान वाटतो. नवा दिवस, नवा सामना आणि अंतिम सामन्याचा दबाव वेगळाच असतो, परंतु आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात संघात एक बदल करतान राहुल चहरच्या जागी जयंत यादवला अंतिम ११मध्ये संधी देत आहोत. दिल्लीकडे डावखुरे फलंदाज अधिक असल्यानं हा डाव खेळत आहोत.''
आज कोणते विक्रम मोडणार
- मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला ८ धावा कराव्या लागतील, तर ४३ धावा करताच कर्णधार म्हणून ३००० धावा तो पूर्ण करेल.
- आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करण्यासाठी किरॉन पोलार्डला २ उत्तुंग फटके मारावे लागतील
- दिल्ली कॅपिटल्सकडून १५०० धावा पूर्ण करण्यासाठी शिखर धवनला ३६ धावांची गरज आहे
- आयपीएल २०२०त ५०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी श्रेयस अय्यरला ४६ धावा कराव्या लागतील
Web Title: IPL 2020 Final MI vs DC: Rahul Chahar misses out and Jayant Yadav comes in, Just a tactical decision, they have many left handers, say Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.