Join us  

IPL 2020: 'या’ माजी दिग्गज गोलंदाजाचं मार्गदर्शन ठरतंय मुंबई इंडियन्ससाठी बुस्टर!

IPL 2020: कोलकात्याविरुद्ध मोठा विजय मिळवून गुणतालिकेत मुंबईची पहिल्या स्थानी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 7:27 PM

Open in App

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अखेर आपल्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला (kolkata Knight Riders) एकतर्फी सामन्यात सहजपणे नमवून Indian Premier League (IPL 2020) च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. कोलकाताचा जरी पराभव झालेला असला, तरी इतर संघांसाठी हा एकप्रकारे धोक्याचा इशारा ठरला आहे. मुंबईच्या विजयात वेगवान गोलंदाजांचे योगदान मोलाचे ठरले. मुंबईच्या वेगवान गोलंदाजीला धार देण्याचे काम भारताचा माजी वेगवान गोलंदाज करत असून त्याचेच मार्गदर्शन मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरत आहे.सलामीला मुंबई इंडियन्सने फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार सुरुवात केली, मात्र यानंतरही त्यांना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. कोलकाताविरुद्ध मात्र मुंबईने या चुका टाळल्या आणि दमदार विजय मिळवला. मुंबईकडे सुरुवातीपासूनच दमदार वेगवान गोलंदाजांची फौज राहिली आहे. लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्त्व केले आहे. यंदा त्यात भर पडली ती न्यूझीलंडचा भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्ट याची. यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा वेगवान मारा सर्वात खतरनाक मानला जात आहे. असे असले तरी, या सर्वांना आत्मविश्वास मिळवून देतोय तो भारताच माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan). झहीर खानच्या अनुभवाचा फायदा मुंबईच्या गोलंदाजांना होत असल्याचे आता दिसून येत आहे. स्वत: झहीर देशांतर्गत सामन्यांत मुंबईकडून खेळला असून आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मिळवलेल्या दिमाखदार विजयानंतर मुंबईच्या संघात उत्साहाचे वातावरण असून झहीर खान आपल्या खेळाडूंना मोलाचा संदेश देत असतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने ट्वीटरवर पोस्ट केला आहे. 

या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड व्हायरल आणि लाईक्स केले असून पुढील सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सला शुभेच्छाही दिल्या आहेत. 

टॅग्स :IPL 2020झहीर खानमुंबई इंडियन्स