Join us  

IPL 2020 : गोलंदाजी शिकायची असेल, तर हा व्हिडिओ बघाच; झहीर खानचे मराठीतून मार्गदर्शन

चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघामध्येही अनेक युवा खेळाडूंचा भरणा असून सध्या सोशल मीडियावर झहीर खानचा युवा गोलंदाजांला मार्गदर्शन करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 2:55 PM

Open in App

मुंबई - आयपीएल म्हणजे युवा क्रिकेटपटूंसाठी हक्काचे व्यासपीठ. या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ भारतीयच नाही, तर विदेशातीलही अनेक युवा क्रिकेटपटूंना आपापल्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच देशासाठी खेळण्याचे स्वप्न बाळगलेला प्रत्येक युवा क्रिकेटपटू आयपीएलमध्ये छाप पाडण्यास उत्सुक असतो. चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघामध्येही अनेक युवा खेळाडूंचा भरणा असून सध्या सोशल मीडियावर झहीर खानचा युवा गोलंदाजांला मार्गदर्शन करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. झहीर या गोलंदाजाला मराठीतून मार्गदर्शन करत असल्यानेच नेटिझन्सनी मुंबई इंडियन्सचे आणि झहीरचे खूप कौतुक केले आहे.मुंबई इंडियन्स आज किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध भिडेल. दोन्ही संघांमध्ये तडाखेबंद फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांचा समावेश असल्याने या सामन्यात पुन्हा एकदा चौकार-षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच दोन्ही संघांना आपल्या याआधीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असल्याने विजय मिळवून पुन्हा एकदा विजयी मार्गावर येण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून होईल.या सामन्याआधी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते, झहीर खान. मुंबईच्या युवा गोलंदाजाला मोलाचे टीप्स देताना झहीर शुद्ध मराठीत संभाषण करत असल्याचे यावेळी दिसून आले. युवा वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख अद्याप आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. मात्र त्याला नेट्समध्ये जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, धवल कुलकर्णी, मिशेल मॅक्लेनघन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या वेगवान गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याची संधी मिळत आहे. याशिवाय, झहीर खान आणि शेन बाँड या दिग्गज गोलंदाजांकडून टीप्सही मिळत आहे.मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये झहीर दिग्विजयला गोलंदाजीदरम्यान पाय कसा टाकावा, याचे मार्गदर्शन देताना दिसतो. दिग्विजय आणि झहीर यांचे मराठीतून सुरु असलेले संभाषण पाहून नेटिझन्सनीही या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडताना, आपल्या खेळाडूसाठी आपल्या भाषेत मारदर्शन केल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत चाहत्यांनी झहीर खानचे कौतुकही केले आहे. 

 

 

टॅग्स :IPL 2020झहीर खानमुंबई इंडियन्स