Join us  

IPL 2020: केवळ ८५ धावांनी दूर आहे कोहलीचा हा ‘विराट’ विक्रम; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीकडे लक्ष

कोहलीला आतापर्यंत आपल्या दोन्ही सामन्यांत मोठ्या खेळी करण्यात यश आले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 1:24 PM

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज एकमेकांविरुद्ध भिडतील. दोन तगडे फलंदाज एमेकांविरुद्ध आपल्या नेतृत्त्व कौशल्य आणि फलंदाजीच्या जोरावर आव्हान निर्माण करणार असल्याने सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या लढतीकडे लागले आहे. या सामन्यात कोहलीकडे टी-२० क्रिकेटमधील एक महत्त्वाचा विक्रम नोंदविण्याची संधी चालून आहे.

कोहलीला आतापर्यंत आपल्या दोन्ही सामन्यांत मोठ्या खेळी करण्यात यश आले नाही. दुसऱ्या सामन्यात केवळ एक धाव काढून बाद झाल्यानंतर त्याच्यावर टीकाही झाली. त्याचवेळी दुसरीकडे, रोहित शर्माने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध झालेला पराभव मागे टाकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तडाखेबंद अर्धशतक ठोकत सर्वांनाच इशारा दिला आहे. त्यामुळेच या दोन दिग्गज फलंदाजांचा खेळ आज कसा होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कोहली आणि रोहित या दोघांनीही क्रिकेटविश्वात अनेक विक्रम रचले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्येही या दोघांकडून अनेक विक्रम रचले जातील हे नक्की. असाच एक अत्यंत मोठा विक्रम रचण्याची संधी कोहलीला चालून आली आहे ती मुंबईविरुद्धच्या सामन्यात. सलग दोन सामन्यात अपयशी ठरल्याने मुंबईविरुद्ध कोहली नक्कीचे त्वेषाने खेळेल याची खात्री क्रिकेटप्रेमींना आहे. त्यामुळेच जर का कोहलीने या सामन्यात ८५ धावांची खेळी केली, तर तो एका मोठ्या विक्रमाचा धनी होईल.

टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला ९ हजार धावांचा पल्ला पार करता आलेला नाही. मात्र या विक्रमापासून कोहली केवळ ८५ धावांनी दूर आहे. त्यामुळेच मुंबईविरुद्ध जर कोहलीने ८५ धावा केल्या, तर तो टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण करणारा पहिल भारतीय ठरेल. सध्या कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये २८३ सामन्यांतून ८,९१५ धावा करुन भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.कोहलीने ९ हजार धावांच पल्ला गाठल्यास अशी कामगिरी करणारा तो एकूण सातवा फलंदाज ठरेल. याआधी असा पराक्रम खिस गेल (१३,२९६ धावा), किएरॉन पोलार्ड (१०,२३८), ब्रेंडन मॅक्क्युलम (९,९२२),  शोएब मलिक (९,९०६), डेव्हिड वॉर्नर (९,३१८) आनि अ‍ॅरोन फिंच (९,०८८) यांनीच केली आहे. 

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माIPL 2020