गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात Indian Premier Leauge 2020चा सलामीचा सामना होणार आहे. इतर पर्वाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स ( MI) जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. IPL 2020च्या पहिल्या सामन्याला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत आणि मुंबई इंडियन्सनं त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी सांगितली. MI कडे सलामीसाठी रोहित शर्मा, ख्रिस लीन, क्विंटन डी'कॉक हे तीन पर्याय आहेत. पण, यापैकी कोण दोघं सलामीला येणार, हे MIनं गुरुवारी स्पष्ट केलं.
मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी Rohit Sharmaने दिली Big News; IPL 2020साठी आखलाय खास प्लान
2019मध्ये मुंबई इंडियन्सनं भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला करारबद्ध केलं होतं आणि त्याला मधल्या फळीत जागा मिळावी यासाठी रोहितनं सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता. रोहित मागच्या मोसमात सलामीला खेळला होता आणि त्यानं 15 सामन्यांत 405 धावा केल्या होत्या. पण, यंदा ख्रिस लीनचा समावेश झाल्यानं रोहित पुन्हा मधल्या फळीत खेळेल का? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्याचं उत्तर मुंबई इंडियन्सं गुरुवारी दिलं.मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धने यानं सांगितले की,'' ख्रिस लीन हा एक उत्तम खेळाडू आमच्या ताफ्यात दाखल झाला आहे. पण, रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक ही दमदार जोडी आहे. त्यांनी संघाला अनेकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. मग त्यात बदल का करायचा?''
जयवर्धने पुढे म्हणाला,''दोन दिवसांपूर्वी आम्ही सराव सामना खेळला आणि खेळाडूंच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. UAEतील खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे आणि कृणाल पांड्या हा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्याच्या जोडीला राहुल चहर आहेच. त्याशिवाय आम्ही युवा फिरकीपटू प्रिन्स बलवंत राय यालाही ताफ्यात घेतले आहेच. आमच्या गोलंदाजी विभागावर पूर्ण विश्वास आहे. ''
जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Mumbai Indians Schedule, IPL 2020 )
19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई1 ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी4 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजाह6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह
मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली, शतकवीर ग्लेन मॅक्सवेलनं मोडला कपिल देव यांचा विक्रम