Join us  

IPL 2020 SRH vs KXIP : सुपरफास्ट पुरन, यंदाच्या हंगामात केली नव्या विक्रमाची नोंद

IPL 2020 SRH vs KXIP Update : मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मयांक अग्रवाल आणि केएल राहुलसारखे स्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर निकोलस पूरनने धडाकेबाज फलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 10:59 PM

Open in App

दुबई - किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू असलेल्या लढतीत जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीनंतर निकोलस पुरनच्या स्फोटक फलंदाजीची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली. हैदराबादने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यावर निकोलस पुरनने घणाघाती फटकेबाजी करत यंदाच्या हंगामात नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मयांक अग्रवाल आणि केएल राहुलसारखे स्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर निकोलस पूरनने धडाकेबाज फलंदाजी केली. अब्दुल समदने टाकलेल्या एका षटकात २८ धावा कुटत पुरनने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कुठल्याही फलंदाजाने फटकावलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक फटकावण्याचा मान लोकेश राहुलच्या नावावर आहे. राहुलने १४ चेंडूत अर्धशतक फटकावले होते. तसेच पुरनने फटकावलेले अर्धशतक हे किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आतापर्यंतच्या इतिहासात फटकावण्यात आलेले हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले आहे.

आयपीएल टि-20 स्पर्धेच्या 13व्या पर्वातील 22वा सामना आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धकिंग्स इलेव्हन पंजाबदरम्यान खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाब समोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. SRH vs KXIP Live Updates  

वॉर्नर-बेअरस्टो यांच्यात 1000+ धावांची भागीदारी -कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. याच बरोबर वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्यात एकूण 16 डावांत एक हजारहून अधिक धानवांची भागीदारी झाली आहे. यादरम्यान या दोघांनीही  5 वेळा शतकी तर 5 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाब