Join us  

IPL 2020 होणार संपूर्ण स्वदेशी; टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत 'टाटा सन्स' आघाडीवर; पाच जणांमध्ये स्पर्धा

IPL 2020 : भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती, त्यामुळे Vivoने माघार घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 6:12 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत देशातील मोठं नाव दाखल झालं आहे. टाटा सन्स यांनी टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत उडी घेतली असून त्यांचे पारडे जड मानले जात आहे. टायटल स्पॉन्सरशीपसाठी अर्ज करण्याची आजची अखेरची संधी होती आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाच जणांनी अर्ज केल्याचे वृत्त InsideSport ने प्रसिद्ध केलं आहे. टाटा सन्स व्यतिरिक्त बायजू. रिलायन्स जिओ, पतांजली आणि अनअकॅडमी यांनी टायटल स्पॉन्सरशीपसाठी रस दाखवला आहे.

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी चेन्नईसाठी रवाना; CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल

भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं यंदा संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपवरून माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. 18 ऑगस्टला यंदाच्या आयपीएलचा टायटल स्पॉन्सर कोण असेल हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) जाहीर करेल.

OMG : पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला जाणवला श्वसनाचा त्रास अन्....

सूत्रांच्या माहितीनुसार टाटा सन्स यंदा टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क जिंकण्याची शक्यता अधिक आहेत. आर्थिकदृष्ट्या आणि देशातील मोठं नाव, लक्षात घेता त्यांचे पारडे जड आहे. सर्वाधिक बोली पाहून टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क दिले जाणार नाही, तर अन्य गोष्टींचाही विचार केला जाईल, असे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं आहे. टाटा सन्सला रिलायन्स जिओकडून कडवी टक्कर मिळू शकते. आयपीएलच्या सेंट्रल स्पॉन्सर्समध्ये टाटा मोटर्स आहे आणि ते त्यासाठी 42-45 कोटी रुपये मोजतात. आता टायटल स्पॉन्सरशीपसाठी टाटा सन्स 250-275 कोटी मोजण्याच्या तयारीत आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!

शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

टॅग्स :आयपीएल 2020टाटाजिओपतंजलीविवो