इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या लीगसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय झाला. यूएईत कोरोना व्हायरसच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) कर्णधार विराट कोहलीनं बायो बबलच्या नियमांचं काटेकोर पालन करा, अशा सूचना केल्या आहेत. त्यात त्यानं खेळाडूंना इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही, असेही सांगितले.
आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार
विराट कोहलीनं RCBच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक मत व्यक्त केलं. कोरोना संकटात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणे, हे भाग्यच असल्याचे तो म्हणाला. ''मी गेली दहा वर्ष दिवस-रात्र क्रिकेट खेळतोय...त्यामुळेच एकही सामना मिस होता कामा नये, याकडे माझे सर्व लक्ष केंद्रीत आहे. आम्ही सर्व येथे क्रिकेट खेळायला आलोय.. संपूर्ण स्पर्धेदरम्यान बायो बबल नियमांचा आदर राखायलाच हवा. आम्ही येथे मजा करायला किंवा भटकायला आलेलो नाही. मला दुबईत फिरायचे आहे, असे सांगू शकत नाही,''असेही कोहली म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''या परिस्थितीचा स्वीकार करा आणि त्यानुसार काळजी घ्या. या काळातही क्रिकेट खेळायला मिळतेय, याचं भाग्य माना. त्यामुळे नियमांचं उल्लंघन होईल, असे वागू नका.''
रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं
त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी
IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला