Join us  

IPL 2021 : २९ सदस्यांना कोरोनाची लागण, तरीही मुंबईतील सामने हलवण्यास BCCI तयार नाही; 'ही' आहेत तीन कारणं!

Indian Premier League 2021 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील दहा सामने खेळवण्यात येणार आहेत. ( 3 big reasons why BCCI said ‘NO’ to shifting IPL 2021 matches from Mumbai )

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:40 PM

Open in App

Indian Premier League 2021 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील दहा सामने खेळवण्यात येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स ( CSK vs DC) यांच्यात १० एप्रिलपासून मुंबईतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. पण, मुंबईतील आयपीएल संदर्भातील २९ सदस्य आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं काही कडक निर्बंध जाहीर केली आहेत. अशात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यानं मुंबईतील सामने हैदराबादला खेळवा, असा प्रस्ताव BCCIसमोर ठेवला. तरीही BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) ने सामने वेळापत्रकानुसारच होतील, हे स्पष्ट केले. IPL 2021 : वानखेडे स्टेडियममध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; आतापर्यंत २९ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने

१० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स१२ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स१५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स१६ एप्रिल - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स१८ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स१९ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स२१ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स२२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स२४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स२५ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

BCCI सामने मुंबईतून का इतरत्र हलवत नाही( 3 big reasons why BCCI said ‘NO’ to shifting matches from Mumbai)

  1. प्रत्येक संघांची सदस्यसंख्या किमान ४० इतकी आहे. यामध्ये खेळाडू आणि कोचिंग स्टाफचा समावेश आहे. जर बीसीसीआयनं मुंबईतील सामने दुसऱ्या शहरात खेळवण्याचा विचार केल्यास त्यांना चार संघांच्या सदस्यांसाठी २०० रुम्सची सोय करावी लागेल. त्याशिवाय अम्पायर्स व अन्य स्टाफसाठी ३० रुम्स आणि अन्य क्रू सदस्यांसाठी १०० रुम्स लागतील.
  2. मुंबईतून अन्य शहरांत जाण्यासाठी चार्टर्ड प्लेनची सोय करावी लागेल आणि आर्थिकदृष्ट्या बीसीसीआयला ते प्रचंड महाग पडेल आणि ऐनवेळेस हे करणं अवघड आहे.
  3. प्रवासामुळे पुन्हा खेळाडूंच्या सुरक्षेचा व बायो बबलचा प्रश्न निर्माण होईल. ठरलेल्या वेळापत्रकात बदल म्हणजे पुन्हा नव्यानं आयसोलेशन नियमांचं पालन करावं लागेल. बीसीसीआयच्या नियमानुसार खेळाडूंना ७ दिवस सक्तिच्या क्वारंटाईन कालावधीत रहावं लागतं. सध्याच्या घडीला तेही शक्य नाही.
टॅग्स :आयपीएल २०२१मुंबईमहाराष्ट्रबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या