IPL 2021 : खेळाडू नर्व्हस, ऑस्ट्रेलियात जाता येणार की नाही?’; डेव्हिड हसीने दिली माहिती

आयपीएलसाठी सर्व खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासाठी कठोर बायो बबल तयार करण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक विदेशी खेळाडूंना कोरोनाची धास्ती वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:53 PM2021-04-27T18:53:50+5:302021-04-27T18:54:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Australian Players Nervous Whether They Can Get Back To Australia, Says David Hussey | IPL 2021 : खेळाडू नर्व्हस, ऑस्ट्रेलियात जाता येणार की नाही?’; डेव्हिड हसीने दिली माहिती

IPL 2021 : खेळाडू नर्व्हस, ऑस्ट्रेलियात जाता येणार की नाही?’; डेव्हिड हसीने दिली माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची भारतातील गंभीर स्थिती पाहून ऑस्ट्रेलियाच्या काही क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून माघार घेतली. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा अँड्रयू टाय याने माघार घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळणार अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसनन यांनी वैयक्तिक कारण देत आयपीएलमधून माघार घेतली. सध्या भारतातील कोरोनाची स्थिती पाहताना ऑस्ट्रेलियानेही आपल्या देशातून भारतात जाणाऱ्या आणि भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळेच मायदेशी जाता येणार की नाही ही चिंता सध्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भेडसावत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड हसी यानेही याबाबत माहिती देताना सांगितले की,  ‘आयपीएलमध्ये सहभागी प्रत्येक ऑसी खेळाडू मायदेशी परतण्याबाबत नर्व्हस आहे.’ मानलं भावा; ब्रेट ली यानं ऑक्सिजन खरेदीसाठी केली ४३ लाखांची मदत; म्हणाला, भारत हे माझं दुसरं घर!

आयपीएलसाठी सर्व खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासाठी कठोर बायो बबल तयार करण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक विदेशी खेळाडूंना कोरोनाची धास्ती वाटत आहे. मायदेशी प्रवेश मिळणार की नाही अशी चिंता असल्याने अँड्रयू टायने आयपीएल अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर झम्पा आणि रिचर्डसनन यांनीही वैयक्तिक कारण देत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र हे तिघेही अद्याप मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय आता ते बायो बबलमध्येही नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे आता वेगळेच प्रश्न उभे झाले आहेत. भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

सध्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मानसिकतेबाबत डेव्हिड हसी याने सांगितले की, ‘आयपीएलसाठी कठोर बायो बबल बनविण्यात आले आहे. मात्र सध्या भारतातील स्थिती पाहता सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडू चिंतित आहेत. आम्ही बबलमध्ये आहोत. प्रत्येक दुसऱ्या दिवशी आमची चाचणी होत आहे आणि प्रत्येकाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. मात्र दिवसभर बातम्याही मिळत आहेत. लोकांना रुग्णालयातील बेडवर पाहण्यास मिळत आहे. गेल्या रात्री आम्ही संघ बैठकीत यावर चर्चाही केली की, आम्ही नशीबवान आहोत, की क्रिकेट खेळून आम्ही लोकांचे मनोरंजन करतोय.’ IPL 2021 : पॅट कमिन्सनंतर KKRच्या आणखी एका खेळाडूचा पुढाकार; गौतम गंभीर फाऊंडेशनला केली मदत

हसी पुढे म्हणाला की, ‘सध्याची स्थिती पाहून प्रत्येकजण नर्व्हस झाला आहे. काही खेळाडूंच्या वडिलांचे निधन झाले आहे. एका स्टाफच्या वडिलांचेही गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. केकेआरच्या दृष्टिने सांगायचे झाल्यास स्पर्धा सुरु रहावी अशी आमची इच्छा आहे. कारण लॉकडाऊनमध्ये दुसरे काही करण्यासारखे नाही. पण त्याचवेळी, खेळाडूंना मायदेशी परतता येणार का, याचीही चिंता भेडसावत आहे.’ 
 

Web Title: IPL 2021: Australian Players Nervous Whether They Can Get Back To Australia, Says David Hussey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.