IPL 2021, CSK vs RCB: आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यात शारजाच्या मैदानात खेळवला जाणारा हा पहिलाच सामना असणार आहे. शारजाचं स्टेडियम तुललेनं लहान असल्यामुळे आजच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळू शकतो. आजच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जनं नेट्समध्ये भरपूर घाम गाळला.
श्रेयस अय्यर होऊ शकतो भारतीय संघाचा कर्णधार; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी
चेन्नई सुपरकिंग्जच्या नेट्समधील सरावादरम्यान कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात एक जोरदार सामना पाहायला मिळाला. सीएसकेनं याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. धोनीनं नेट्समध्ये जडेजासमोर गोलंदाजी केली आहे. तर जडेजानं धोनीच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांची बरसात करताना पाहायला मिळतोय. यात धोनीनं जडेजाला एका चेंडूवर क्लीन बोल्ड केल्याचंही पाहायला मिळतं.
MS Dhoniकडून आज हरला तर विराट कोहली 'कामा'तून जाणार; RCB कर्णधारपदावरून काढणार?
जडेजानं सुरुवातीला धोनीच्या फिरकीवर मोठे फटके मारले खरे पण अखेरीस धोनीचाच विजय झालेलं पाहायला मिळालं. जडेजाला क्लीन बोल्ड करत धोनीनं लढाई जिंकली. चेन्नईनं या व्हिडिओला ७ विरुद्ध ८ असं कॅप्शन दिलं आहे. ७ हा धोनीच्या, तर ८ हा जडेजाच्या जर्सीचा क्रमांक आहे.
आज आरसीबी विरुद्ध घमासान
आयपीएलमध्ये आज दोन बलाढ्य संघांमध्ये लढत होता आहे. यात विराट कोहली विरुद्ध महेंद्रसिंग धोनी असा सामना पाहायला मिळणार आहे. धोनीचा नेट्समध्ये गोलंदाजी सराव पाहता आजच्या सामन्यात धोनी एखादं षटक टाकण्याची तयारी करतोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई गुणतालिकेत सध्या १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर बंगलोरचा संघ १० अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आजची लढत जिंकून दोन्ही संघांना आपल्या स्थानात बढत मिळवण्याची संधी आहे. चेन्नईनं याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर २० धावांनी मात केली होती. तर आरसीबीला कोलकाता विरुद्ध लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Web Title: ipl 2021 csk shares ms dhoni vs ravindra jadeja super special face off from training
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.