IPL 2021, DC vs SRH: आयपीएलमध्ये आज दुबईत खेळविण्यात आलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सामन्यात हैदराबादनं दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीसारख्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या संघासमोर १३५ धावांचं आव्हानं काही मोठं नसलं तरी मैदानात झोकून देऊन क्षेत्ररक्षण करण्याचं उत्तम उदाहरण हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन यानं आज दाखवून दिलं.
तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला
दिल्लीची सलामीजोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन पुन्हा एकदा चांगल्या फॉर्मात असल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे ही जोडी फोडून संघाला सामन्यात पकड निर्माण करुन देणं विल्यमसनला भाग होतं. खलील अहमदच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पृथ्वी शॉनं डिप मिड विकेटच्या दिशेन अनियंत्रित फटका खेळला. मिड विकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या कर्णधार केन विल्यामननं चेंडू बराच उंच उडाल्याचं टिपलं आणि चेंडूच्या दिशेनं धाव घेतली. मिड विकेटवरुन डिप मिड विकेटवर म्हणझेच अगदी उलट्या दिशेनं धाव घेत केन विल्यमसननं निर्माण झालेली संधी दवडू दिली नाही आणि सुरेश झेल टिपला. पृथ्वी शॉला तंबूत धाडून सलामी जोडी फोडली. पृथ्वी शॉ ११ धावांवर बाद झाला. विल्यमसननं टिपलेल्या झेलचं नेटिझन्स आणि क्रिकेट चाहत्यांकडूनही कौतुक केलं जात आहे.
Web Title: IPL 2021 dc vs srh kane williamson stunning catch of prithvi shaw watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.