Join us  

IPL 2021: 'कोहली ब्रिगेड'ला 'देव' पावला; कोरोनावर मात करून धडाकेबाज सलामीवीर संघात परतला!

IPL 2021, Devdutt Padikkal: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पराभूत करुन आयपीएलच्या यंदाच्या सीझनची विजयानं सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 1:45 PM

Open in App

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पराभूत करुन आयपीएलच्या यंदाच्या सीझनची विजयानं सुरूवात केली. पण आता बंगळुरूचा मुकाबला डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला विजय प्राप्त करुन देण्यात युवा गोलंदाज हर्षल पटेल आणि एबी डिविलियर्स यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं. दरम्यान हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी आरसीबीसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. कोरोनावर मात करुन संघाचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आता पूर्णपणे फिट झाला आहे. पडिक्कल आता हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. (IPL 2021 Devdutt Padikkal available for the encounter against Sunrisers Hyderabad)

चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना होणार आहे. बंगळुरूच्या संघानं पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय प्राप्त केला आहे. तर हैदराबादच्या संघाला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं देवदत्‍त पडिक्‍कलच्या अनुपस्थितीत  विराट कोहलीसोबत वॉशिंग्टन सुंदर याला सलामीसाठी पाठवलं होतं. पडिक्कल सध्या तुफान फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये गेल्या मोसमात आरसीबीसाठी त्यानं सर्वाधिक 473 धावा केल्या होत्या. 

देवदत्त पडिक्कल सज्जदेवदत्‍त पडिक्‍कल आता पूर्णपणे फिट झाल्याची माहिती संघाचे संचालक माइक हेसन यांनी दिली आहे. "पडिक्कलचा हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी विचार केला जात आहे. त्याला संघात खेळवलं जाण्याचीच शक्यता अधिक आहे", असं हेसन यांनी सांगितलं. तर पडिक्कलनंही दमदार कामगिरीसाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. "मी आता पूर्णपणे फिट असून मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. मी उत्तम फलंदाजी करू शकतोय हीच माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण आयपीएलमध्ये एका सलामीवीरासाठी हिच महत्वाची गोष्ट असते. अशा स्पर्धांसाठी तुम्हाला १०० टक्के तयार राहावं लागतं", असं पडिक्कलनं एका व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :देवदत्त पडिक्कलविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२१