मुंबई : पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने आपला दर्जा सिद्ध करताना कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करत विजय मिळवला. शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव करत यंदाच्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवला. यासह मुंबईकरांनी गुणतालिकेत अव्वल स्थानीही झेप घेतली. मात्र, असे असले, तरी हैदराबादचे दोन गोलंदाज डोकेदुखी ठरत असल्याचे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. ‘राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांची गोलंदाजी खेळणे सोपे नाही,’ असे रोहितने सांगितले.
SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?
पुन्हा एकदा मुंबईने गोलंदाजांच्या जोरावर रोमहर्षक विजय मिळवण्यात यश मिळवले. रोहितनेही या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले. ‘फलंदाजीदरम्यान मधल्या षटकांमध्ये फटकेबाजी करणे कठीण झाले होते. मात्र गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. आम्हाला माहित होते की, हैदराबादसाठी धावांचा पाठलाग करणे सोपे ठरणार नाही. अशा खेळपट्टीवर गोलंदाज जेव्हा नियोजनबद्ध मारा करतात, तेव्हा कर्णधार म्हणून तुमचे काम सोपे होते,’ असे रोहित म्हणाला. त्याचवेळी त्याने हैदराबादच्या गोलंदाजांचेही कौतुक केले.
नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'
रोहित म्हणाला की, ‘माझ्या मते जशी खेळपट्टी होती त्यानुसार आम्ही उभारलेली धावसंख्या चांगली होती. दोन्ही संघांनी पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मधल्या षटकांमध्ये दोन्ही संघांकडून चुका झाल्या. हैदराबादकडे राशिद आणि मुजीब असे गोलंदाज आहेत, ज्यांच्याविरुद्ध फलंदाजी करणे नक्कीच सोपे नसते. खेळपट्टी संथ होत असताना या गोलंदाजांविरुद्ध खेळणे कधीही कठीण ठरते.’