-ललित झांबरेकोणत्याही प्रकाराच्या क्रिकेट सामन्यात क्वचितच दिसते असे चित्र मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द (KKR) मुंबईच्या (MI) डावात दिसले. डावातील पहिली पाच षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली. हरभजनसिंगने (Harbhajan) दोन, वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravorthy) दोन आणि शकिब अल हसनने (Shakib Al Hasan) एक...याप्रकारे पाॕवर प्लेच्या सहा मधील पाच षटकं फिरकी गोलंदाजांनी टाकली आणि हा डाव काहीसा यशस्वीसुध्दा झाला. क्विंटन डी कॉकला बाद करण्यासह मुंबईला 37 धावांत मर्यादीत ठेवण्यात त्यांनी यश मिळवले. 'कोहली ब्रिगेड'ला 'देव' पावला; कोरोनावर मात करून धडाकेबाज सलामीवीर संघात परतला!
आयपीएलमध्ये केवळ चौथ्यांदाच असे घडले की डावात पहिले तीन गोलंदाज जे होते ते फिरकी गोलंदाज होते. आणि यापैकी तीन वेळा हे गोलंदाज वापरणारा संघ केकेआरच होता. शिवाय आयपीएलमध्ये केवळ दुसऱ्यांदाच पहिली सलग पाच षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली. असा प्रयोग पहिल्यांदा करणारा संघसुध्दा केकेआरचाच होता. 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरूध्दच्या सामन्यात रांची येथे त्यांनी शकिब अल हसन व सुनील नारायणकडून पहिली पाच षटके गोलंदाजी करुन घेतली होती. चाहरच्या चार विकेट रसेलच्या पाच विकेटला का भारी पडल्या? समजून घ्या सामन्याचं गणित...
...पण केकेआरने असे का केले असावे?पॉवर प्लेमधील सहा पैकी पाच षटके फिरकीपटूंकडून का टाकून घेतले असावेत? याचे एक कारण असू शकते मुंबईचे सलामी फलंदाज. 2019 पासूनची आकडेवारी पाहिली तर रोहित शर्माला रोखून धरण्यात फिरकी गोलंदाजच यशस्वी ठरले आहेत. जिथे रोहितने जलद व मध्यमगती गोलंदाजांविरुध्द 41 ची सरासरी आणि 131 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत तिथे फिरकीवरुन त्याचे हेच आकडे 13 ची सरासरी व 98 चा स्ट्राईक रेट असे राहिले असते. क्विंटन डी'काॕकबद्दलही असेच आहे. पाॕवर प्लेमध्ये फिरकीविरुध्द त्याचा स्ट्राईक रेट 101 तर जलद गोलंदाजीविरुध्द 150 चा आहे.
दुसरे कारण म्हणजे मुंबईच्या फलंदाजी फळीत नंतर इशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड व कृणाल पांड्यासारखे एकाहून एक फटकेबाज आहेत. त्यांच्यापासून फिरकी गोलंदाजांना लांब ठेवण्याचीही रणनिती असू शकते. शिवाय संध्याकाळच्या वेळी दवाचा विषय लक्षात घेता चेंडू कोरडा असतानाच त्यावर फिरकीसाठी हाताची वा बोटांची पकड राहिल तोवरच फिरकीपटूंना वापरणे श्रेयस्कर वाटत असावे. एकदा का दवामुळे ओलसरपणा आला की चेंडूवर पकड राखणे अवघड जाते हे सुद्धा कारण असू शकते.