IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : सलग तीन सामने गमावलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची ( MI) बाद फेरी गाठण्याची वाटचाल अडचणीत आली आहे. अबुधावी येथे आज मुंबईला सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असलेल्या पंजाब किंग्सविरुद्ध ( PBKS) भिडायचे आहे. सलग तीन पराभवांमुळे मुंबईचा संघ पंजाबच्या पंक्तित जाऊन बसला आहे आणि त्यामुळे यापुढील प्रत्येक सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईनं आजच्या सामन्यात दोन बदल केले आणि मुख्य म्हणजे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळवलेल्या इशान किशनला ( Ishan Kishan) आजच्या सामन्यात बाकावर बसवले आहे. अॅडम मिल्ने यालाही विश्रांती दिली गेली आहे.
- रोहित शर्मानं आजच्या सामन्यात २ षटकार खेचल्यास तो ४०० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनेल.
- या पर्वात रोहितनं फिरकीपटूंविरोधात १६३ धावा केल्या आहेत आणि ही सर्वोत्तम कामगिरी आहे
इशान किशन फॉर्माशी झगडत आहे आणि RCBविरुद्धच्या लढतीत अपयशानंतर तो रडवेला झाला होता. विराट कोहलीनं त्याला मार्गदर्शन केलं. अशात आजच्या सामन्यात इशानच्या जागी सौरभ तिवारी याला संधी मिळाली आहे, तर मिल्नेच्या जागी नॅथन कोल्टर नायल खेळणार आहे. ( Saurabh Tiwary in for Ishan Kishan, and Coulter-Nile for Milne.)
मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
पंजाब किंग्सचा संघ - लोकेश राहुल, मनदीप सिंग, ख्रिस गेल, एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, नॅथन एलिस, अर्षदीप सिंग