Join us  

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात २७१ विकेट्स घेणारा गुजरातचा गोलंदाज; जलद माऱ्याची ताकद वाढली!

Franchises name replacements for remainder of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 5:13 PM

Open in App
ठळक मुद्दे इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. IPLनं ही सर्व नावं शनिवारी जाहीर केली

Franchises name replacements for remainder of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. IPLनं ही सर्व नावं शनिवारी जाहीर केली. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघानी आपापल्या ताफ्यात काही नवे खेळाडू सहभागी करून घेतले आहेत. रविवारपासून यूएईत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. ( Delhi Capitals (DC), Mumbai Indians (MI), Punjab Kings (PBKS), Rajasthan Royals (RR), Royal Challengers Bangalore (RCB) & Sunrisers Hyderabad (SRH) named more replacements for the remainder of the IPL 2021) 

पाकिस्तान सुरक्षित; न्यूझीलंडच्या वागण्याकडे लक्ष देऊ नका, शाहिद आफ्रिदीचे इंग्लंडला आवाहन

पंजाब किंग्सनं झाय रिचर्डसन व रिली मरेडीथ यांच्याजागी आदील राशिद व नॅथन एलिस यांच्या नावाची आधीच घोषणा केली होती. इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान खेळणार नसल्यानं त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला करारबद्ध केले आहे.  राजस्थान रॉयल्सनंही बेन स्टोक्स व जोस बटलर यांच्याजागी ओशाने थॉमस व एव्हिन लुईस यांना ताफ्यात घेतले. RCBनं बंगालचा मध्यमगती गोलंदाज आकाश दीपला दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी घेतले आहे. आकाश दीपनं ९ प्रथम श्रेणी, ११ लिस्ट ए आणि १५ ट्वेंटी-२० सामन्यांत ७३ विकेट्स घेतल्या आहेत.

IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं जिंकलं मन

DC नं इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोस्क याच्या जागी बेन ड्वारशूईसचा संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूनं ८२ ट्वेंटी-२० सामन्यांत १०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय दिल्लीनं एम श्रीधर याच्याजागी मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू कुलवंत खेज्रोलिया याला करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सनं गुजरातचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रूश कलारिया याला मोहसिन खानच्या जागी करारबद्ध केले आहे. कलारियानं ५४ प्रथम श्रेणी, ४६ लिस्ट ए आणि ३१ ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण २७१ विकेट्स घेतल्या आहेत. ( Mumbai Indians have named Gujarat’s left-arm medium pacer Roosh Kalaria to their squad in place of Mohsin Khan. Kalaria has thus far played 54 First-Class matches, 46 List A games and 31 T20s picking a total of 271 wickets)

 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App