IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना सुरू आहे. PBKS नं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. SRHसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या गोलंदाजांनी संघाला साजेशी सुरूवातही करून दिली आहे. पंजाबचे ४ फलंदाज अवघ्य ४७ धावांवर माघारी पाठवून SRHनं सामन्यावर पकड बनवली आहे. पण, पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यानं याच सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकले आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, विजय शंकर, विराट सिंग, केदार जाधव, अभिषेक शर्मा, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद
पंजाब किंग्ज (Punjab Kings) - मयांक अग्रवाल, केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पुरन, शाहरुख खान, एम हेन्रीकस, फॅबियन एलन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला चौथ्याच षटकात ४ धावांवर भुवनेश्वर कुमारनं चालतं केलं. पण, त्यानं या चार धावांसह मोठा पराक्रम करून दाखवला. मयांक अग्रवाल ( २२), ख्रिस गेल ( १५) व निकोलस पूरन ( ०, धावबाद) हे झटपट माघारी परतले. लोकेशनं त्या चार धावांसह टी-२०त ५००० धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-२०त सर्वात जलद ५००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं अव्वल स्थान पटकावले.
सर्वात जलद ५००० धावा करणारे भारतीय फलंदाज ( डाव)लोकेश राहुल - १४३विराट कोहली - १६७सुरेश रैना - १७३शिखर धवन - १८१रोहित शर्मा ( १८८)
जगातील फलंदाज ( Fastest to 5000 T20 runs (By innings)ख्रिस गेल ( १३२) लोकेश राहुल ( १४३)शॉन मार्श ( १४४)बाबर आजम ( १४५)अॅरोन फिंच ( १५९)