IPL 2021, PBKS vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबाद संघाचे ( Sunrisers Hyderabad) खेळाडू आज फुल चार्ज होऊन मैदानावर उतरले. गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या दोन्ही आघाड्यांवर SRHच्या खेळाडूंची कामगिरी सुरेख होताना दिसत आहे. पंजाब किंग्सचे ( Punjab Kings) शेर आज ढेर झाले. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांना आज कागदावरचे वाघ, बनवून ठेवले. झटपट विकेट गेल्यानंतर पंजाब किंग्सनं त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करताना विंडीजचा तडाखेबाज फलंदाज निकोलस पुरन ( Nicholas Pooran) याला चौथ्या क्रमांकावर बढती दिली. पण, ख्रिस गेलनं ( Chris Gayle) एक धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याला धावबाद केलं. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं अप्रतिम फिल्डिंग करताना, पूरनला डायरेक्ट हिटवर धावबाद केलं. लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आजमला पुरुन उरला; मोठा पराक्रम केला!
पाहा व्हिडीओ...
PBKS नं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचे ४ फलंदाज अवघ्य ४७ धावांवर माघारी पाठवून SRHनं सामन्यावर पकड बनवली आहे.प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला चौथ्याच षटकात ४ धावांवर भुवनेश्वर कुमारनं चालतं केलं. पण, त्यानं या चार धावांसह मोठा पराक्रम करून दाखवला. मयांक अग्रवाल ( २२), ख्रिस गेल ( १५) व निकोलस पूरन ( ०, धावबाद) हे झटपट माघारी परतले. लोकेशनं त्या चार धावांसह टी-२०त ५००० धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-२०त सर्वात जलद ५००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं अव्वल स्थान पटकावले,तर जगात तो दुसऱ्या स्थानी पोहोचला.
निकोलस पूरनचा नकोसा विक्रमयंदाच्या आयपीएलमध्ये पूरनला चार डावांत फक्त ९ धावा करता आल्यात. विशेष म्हणजे या ९ धावा त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केल्या. अन्य सामन्यांत तो ० (१), ०(२) व ० (०) असा बाद झाला आहे. पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी फिरल्यानंतर Golden duck ( वि. राजस्थान रॉयल्स), दुसऱ्या चेंडूवर Silver duck ( वि. चेन्नई सुपर किंग्स) आणि एकही चेंडूचा सामना न करता Diamond duck ( वि. सनरायझर्स हैदराबाद) असा एकाच पर्वात बाद होणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
पंजाब किंग्सच्या सर्वबाद १२० धावामयांक अग्रवाल ( २२), शाहरुख खान ( २२) ही दोघं वगळता पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी आज निराश केले. खलील अहमदनं २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. राशिद खाननं ४ षटकांत १७ धावांत १ विकेट घेतली. अभिषेक शर्मा ( २/२४), भुवनेश्वर कुमार ( १/७) व सिद्धार्थ कौल ( १/२७) यांची दमदार कामगिरी केली.