IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना होतोय. सामन्याची नाणेफेक पंजाब किंग्जने जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सनराजझर्स हैदराबादसाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे. कारण हैदराबादला सुरुवातीचे तिनही सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे स्पर्धेत अद्याप संघाचं खातं उघडू शकलेलं नाही. डेव्हिड वॉर्नर ब्रिगेडसाठी आजचा सामना जिंकून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जनं गेल्या तीन सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. गुणतालिकेत पंजाब आणि हैदराबाद संघ अगदी तळाशी आहेत. पंजाब सातव्या तर हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून गुणतालिकेतील स्थान सुधारण्याची संधी दोनही संघांना आहे.
हैदराबादच्या संघात आज महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. संघानं मनिष पांडेला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मराठमोळ्या केदार जाधवचं हैदराबादच्या संघात आज पदार्पण होणार आहे. यासोबतच जेसन होल्डरच्या जागी आत केन विल्यमसनला संधी देण्यात आली आहे.
पंजाबच्या संघाकडून कर्णधार केएल राहुलकडून चांगली कामगिरी होत आहे. एक फलंदाज म्हणून तो चांगल्या फॉर्मात आहे. स्पर्धेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. पण सांघिक कामगिरीच्या बाबतीत पंजाबच्या पदरात अपयश पडत आहे. तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरचा संघ अंतिम ११ खेळाडू निश्चित करण्याच्याबाबतीतच संभ्रमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या सामन्यात हैदराबादनं संघात तब्बल ४ मोठे बदल केले होते. त्यानंतरही संघाला विजयाचं खातं उघडता आलेलं नाही.
संघ
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, विजय शंकर, विराट सिंग, केदार जाधव, अभिषेक शर्मा, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद
पंजाब किंग्ज (Punjab Kings) मयांक अग्रवाल, केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पुरन, शाहरुख खान, एम हेन्रीकस, फॅबियन एलन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग