IPL 2021: भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा आयपीएलशी तसा थेट काही संबंध नसला तरी या स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचं बारीक लक्ष आहे. रवी शास्त्री आयपीएलचा प्रत्येक सामना पाहत असतात आणि ते त्यांनी आजवर केलेल्या ट्विट्सच्या माध्यमातून लगेच लक्षातही येतं. रवी शास्त्री यांनी आता आयपीएलचं यंदाचं सीझन कोण जिंकणार याची भविष्यवाणीच केली आहे.
IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!
आयपीएलची यंदाची ट्रॉफी याआधी विजेतेपद पटकावलेल्या संघांपैकीच एक संघ असेल की नवा संघ यंदा विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थात नवा विजेता कोण होईल हे आपल्याला ३० मे रोजीच कळेल. पण रवी शस्त्री यांनी व्यक्त केलेला अंदाज अतिशय महत्वाचा आहे. आयपीएलचं यंदाचं सीझन सध्या पहिल्याच टप्प्यात आहे. अद्याप आयपीएलचे अर्धे सामने देखील झालेले नाहीत. त्यामुळे एवढ्यात यंदाच्या सीझनचा विजेता कोण ठरेल हे सांगणं थोडं घाईचं ठरेल. पण रवी शास्त्री यांना सारंकाही स्पष्ट दिसतंय आणि त्यांच्या अनुभवावरुन काही अंदाज बांधले आहेत.
IPL 2021: बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद, वारंवार चाचण्या आणि खेळाडूंचं लसीकरण; BCCI कडून आणखी कडक नियम
रवी शास्त्री यांच्या शास्त्रानुसार यंदाचं सीझन एक नवा संघ जिंकेल म्हणजे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळेल असं सूचक ट्विट त्यांनी केलं आहे. त्याची तयारी देखील सुरू आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. अर्थात शास्त्री यांनी कोणत्याही संघानं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांनी ट्विट केलेला एक फोटोच सारंकाही सांगून जाणारा आहे. रवी शास्त्री यांनी रॉलच चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचा कर्णधार रिषभ पंत यांचा एक फोटो ट्विट केला आहे.
आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली आणि बंगलोरमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. यात कोहलीच्या संघानं दिल्लीवर अवघ्या एका धावेनं विजय प्राप्त केला. रवी शास्त्री यांनी याच सामन्याचा दाखला देत कालचा सामना जबरदस्त होता असं म्हटलं आहे. यासोबत आयपीएलच्या नव्या विजेत्या संघाचा पाया रचला गेलाय अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होऊ शकते असा अंदाज शास्त्रींना अप्रत्यक्षरित्या व्यक्त केला आहे. या दोन संघांपैकी एक संघ यंदाचं जेतेपद पटकावेल अशी भविष्यवाणी शास्त्री यांनी केली आहे.