IPL 2021, Hardik Pandya: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडनं (Shane Bond) हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) संघाचा समावेश का केला जात नाहीय यावर मोठा खुलासा केला आहे. शेन बाँड यांच्या म्हणण्यानुसार हार्दिक पंड्याची आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघातील उपयुक्तता लक्षात घेता संघ अत्यंक काळजीपूर्वक पावलं उचलत आहे. त्यामुळेच त्याला आराम देण्यात आला आहे.
गांगुलीमुळेच KKR साठी खेळायचं होतं अन् डावखुराही त्याच्यामुळेच झालो: व्यंकटेश अय्यर
हार्दिक पंड्या सराव शिबिरांमध्ये उपस्थित राहत आहे आणि त्याचं ट्रेनिंग देखील उत्तम सुरू आहे. पण आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी तो फिट राहील याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात त्याची निवड केली जात नाहीय, असं शेन बाँड म्हणाले आहेत.
'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...
मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेन बाँड यांनी हार्दिक पंड्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. "रोहित शर्मा प्रमाणेच हार्दिक पंड्या देखील खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग घेत आहे. पंड्या आज देखील ट्रेनिंगसाठी नेट्समध्ये होता. लवकरच तो तुम्हाला खेळताना दिसेल. आम्हाला भारतीय संघाची येत्या काळातील गरज देखील लक्षात घ्यावी लागते. त्यानुसार संघात योग्य समतोल ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. मुंबईची फ्रँचायझी खेळाडूंची विशेष काळजी घेते. आम्हाला केवळ आयपीएल जिंकायचं नाहीय, तर टी-२० वर्ल्डकपसाठीही खेळाडूंना फिट ठेवायचं आहे. हार्दिक पुढच्या सामन्यात दिसेल अशी आशा आहे आणि तो सध्या उत्तम प्रकारे ट्रेनिंग घेत आहे", असं शेन बाँड म्हणाले.
लय भारी... १ हजारी मुंबईचा 'कारभारी'! रोहित शर्माचा KKR विरुद्ध अनोखा विक्रम
हार्दिक सलग दोन सामन्यात संघाबाहेरआयपीएलच्या १४ व्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली असून मुंबईचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याची उणीव प्रकर्षानं जाणवली. मुंबईचा संघ आता गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यसाठी पुढील सामने जिंकणं मुंबईला अतिशय महत्त्वाचं असणार आहे. हार्दिक पंड्याची टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे आणि तो पूर्णपणे फिट असणं भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये पुन्हा एकदा त्याला दुखापतीचं ग्रहण लागू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.