Join us  

MS Dhoni vs Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्सचा नेमका कर्णधार कोण?; महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर संतापले माजी खेळाडू 

IPL 2022, CSK vs LSG MS Dhoni vs Ravindra Jadeja : आयपीएल स्पर्धा इतिहासात पहिले दोन सामने गमावण्याची CSKची ही पहिलीच वेळ ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 1:33 PM

Open in App

IPL 2022, CSK vs LSG MS Dhoni vs Ravindra Jadeja : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आयपीएल २०२२त सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल स्पर्धा इतिहासात पहिले दोन सामने गमावण्याची CSKची ही पहिलीच वेळ ठरली. २१० धावांचे विशाल लक्ष्य उभे करूनही चेन्नईला पराभव पत्करावा लागला. लखनौ सुपर जायंट्सने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करताना दिसला आणि रवींद्र जडेजा एका कोपऱ्यात उभा राहिलेला पाहायला मिळाला.

आयपीएलच्या १५व्या पर्वाला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी धोनीने CSKचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि ती जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली. पण, कालच्या सामन्यात जडेजाचा आत्मविश्वास डळमळलेला दिसला आणि धोनीच सर्व निर्णय घेत असल्याचे दिसले. धोनीच्या या वागण्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा व पार्थिव पटेल यांनी टीका केली. जडेजा हा केवळ कागदावरचा कर्णधार असल्याचे जाणवत होते. 

जडेजा म्हणाला, हे अत्यंत चुकीचं आहे. मी स्वतः धोनीचा खूप मोठा फॅन आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात असेल आणि जेव्हा करा किंवा मरा अशी परस्थित असेल, तेव्हा धोनीचे हे वागणे मी समजू शकतो. पण, दुसऱ्याच सामन्यात धोनीने असे वागणे बरं दिसत नाही. रवींद्र जडेजाच्या बाबतित हे घडतंय, म्हणून मी हे मत मांडत नाही. पण, सामान्य क्रिकेट चाहत्यालाही हे पटणारे नाही. तो मैदानावर आहे आणि धोनी संपूर्ण सामना हाताळतोय. धोनी हा खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याच्याबद्दल असे बोलणे मला आवडत नाही, परंतु आज जे पाहिलं ते चुकीचंच होतं. 

पार्थिव पटेल म्हणाला, जर तुम्हाला एखाद्याला घडवायचे आहे, तर त्याला चुकांमधून शिकू द्या. धोनी जेव्हा जडेजाला कर्णधाराची जबाबदारी घ्यायला देईल, तेव्हा तो कर्णधार बनेल. तो चूका करेल तेव्हा तो शिकेल.  

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्स
Open in App