IPL 2022 Auction: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी ( IPL 2022) लवकरच लिलाव होणार आहे. दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंचा पुन्हा लिलाव करणार आहे आणि त्यासाठी सध्या सहभागी असलेल्या 8 फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडू रिटेन ( कायम राखण्याची) संधी दिली आहे. त्यामुळे कोणती फ्रँचायझी कोणत्या चार खेळाडूंना कायम राखते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल आयोजनकाकडे सुपूर्द करायची आहे. दरम्यान, लोकेश राहुलनं ( KL Rahul) पंजाब किंग्समधून पुढील पर्वात न खेळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals ) ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे.
भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं दिल्ली कॅपिटल्स त्याच्यासह श्रेयस अय्यरला पुढील पर्वासाठी संघात कायम राखणार असल्याचा दावा केला एहा. एका यूट्युब चॅनलशी बोलताना अश्विननं हा दावा केलाय. ''दिल्ली कॅपिटल्स मला रिटेन करणार नाही,'' असे अश्विन म्हणाला. बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी चार खेळाडूंना रिटेन करू शकते आणि अश्विनला वाटते की त्याला व अय्यरला दिल्ली रिटेन करणार नाही. तो पुढे असंही म्हणाला की, दिल्ली तीनपेक्षा जास्त खेळाडूंना रिटेन करेल असे वाटत नाही आणि त्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत, पृथ्वी शॉ व अॅनरिच नॉर्ट्झे यांचा समावेश असेल.
आयपीएल २०२०मध्ये ७.६ कोटींत आर अश्विन पंजाब किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल झाला. त्यानं त्या पर्वात १५ सामन्यांत ७.६१च्या इकॉनॉमीनं १३ आणि आयपीएल २०२१मध्ये १३ सामन्यांत ७.४६च्या इकॉनॉमीनं ७ विकेट्स घेतल्या.
ड्वेन ब्राव्होला CSK रिटेन नाही करणार पण...ड्वेन ब्राव्होनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल २०२२त चेन्नई सुपर किंग्सही त्याला रिटने करण्यास उत्सुक नाही. पण, त्याचं नाव आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्ये दिसेल, असा विश्वास CSKचे CEO कासी विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे. ''ड्वेन ब्राव्हो आयपीएल २०२२त खेळेल. त्यानं फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो तंदुरुस्त आहे आणि खेळू शकतो. तो CSKकडून पुन्हा खेळेल याची खात्री मी देऊ शकत नाही. तो महत्वाचा खेळाडू आहे, परंतु आम्ही फक्त चारच खेळाडू रिटेन करू शकतो.
संबंधित बातम्या
८ फ्रँचायझींना ४ खेळाडूंसाठी दिलंय ४२ कोटींचं बजेट; रोहित शर्मा, विराट कोहली, MS Dhoni यांना फटका?
आयपीएल २०२२मध्ये नव्या संघाना मिळाली 'स्पेशल' पॉवर; हार्दिक, श्रेयस, लोकेश यांना सोडावे लागतील संघ?