IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे, सपोर्ट स्टाफचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. संघातील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतरही हा संघ मैदानावर उतरला आणि पंजाब किंग्सवर बॅकफूटवर फेकले. पंजाब किंग्सनेआयपीएल २०२२मधील सर्वात निचांक धावसंख्या नोंदवली.
शिखर धवन ( ९) व मयांक अग्रवाल ( २४) यांना साजेशी सुरूवात करता आली नाही. रिषभने कल्पक नेतृत्व करताना सुरेख क्षेत्ररक्षण लावले. लाएम लिव्हिंगस्टोन ६व्या षटकात अक्षर पटेलला पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( ९) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पंजाब किंग्सचे ४ फलंदाज ५४ धावांवर माघारी परतले. जितेश शर्मा व शाहरूख खान यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने पंजाबला आणखी एक धक्का देताना जितेशला ३२ धावांवर LBW केले. त्यानंतर कुलदीप यादवने १४व्या षटकात कागिसो रबाडा व नॅथन एलिस यांना त्रिफळाचीत केले. खलिलने १५व्या षटकात शाहरुखची ( १२) विकेट घेत पंजाबची अवस्था ८ बाद ९२ अशी केली.
स्टार फलंदाज ढेपाळल्यानंतर राहुल चहर व अर्षदीप सिंग यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचेच होते. तरीही चहरने १ चौकार व १ षटकारासह १२ धावा केल्या. ललित यादवने त्याला बाद केले. पंजाबचा संपूर्ण संघ ११५ धावांवर तंबूत परतला. खलिल अहमद ( २-२१), ललित यादव ( २-११), अक्षर पटेल ( २-१०) व कुलदीप यादव ( २-२४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2022, DC vs PBKS Live Updates : Punjab Kings registers the lowest total of IPL 2022, 115 all out | 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.