Join us  

Vivo to transfer IPL title rights to Tata- IPL आता ओळखली जाणार TATA IPL; चीनी कंपनी Vivoनं टायटल स्पॉन्सर म्हणून घेतली माघार  

Vivo to transfer IPL title rights to Tata - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 2:38 PM

Open in App

Vivo to transfer IPL title rights to Tata - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. अहमदाबाद आणि लखनौ फ्रँचायझींच्या समावेशामुळे आता जेतेपदाच्या शर्यतीत १० संघ मैदानावर उतरणार आहेत. या दोन नव्या फ्रँचायझींमुळे BCCIला कोट्यवधींची लॉटरी लागली. पण, त्याचवेळी Vivo कंपनीनं टायटल स्पॉन्सर म्हणून माघार घेतल्याचे वृत्त समोर येत आहे आणि आता TATA कंपनीचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आता IPL ही TATA IPL म्हणून ओळखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज होणाऱ्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.  ''Vivo नं त्यांचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही TATA ला टायटल स्पॉन्सर करण्याचा विचार करत आहोत. Vivoचा दोन वर्ष अजूनही करार बाकी आहे आणि त्यामुळे या पुढील दोन वर्षांसाठी TATA टायटल स्पॉन्सर असतील,'' अशी आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ANI ला दिली.  गतवर्षी चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता BCCIनं VIVOला माघार घेण्यास सांगितली होती आणि Dream 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. पण, २०२१मध्ये पुन्हा VIVOकडे टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क आले होते. चायनीझ कंपनी VIVOनं २०१८मध्ये प्रती वर्ष ४४० कोटी यानुसार पाच वर्षांकरीता आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.

 २०२०च्या टायटल स्पॉन्सरशीपमधून VIVOनं माघार घेतली. Dream 11नं २२२ कोटींमध्ये २०२०चं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती.  

टॅग्स :आयपीएल २०२१टाटाविवो
Open in App