IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : २० षटकं खेळून काढल्यानंतरही क्विंटन डी कॉक ( Quinton De Kock ) दमलेला दिसला नाही. ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह नाबाद १४० धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या क्विंटनने यष्टिंमागेही कमाल केली. मोहसिन खानने ( Mohsin Khan) टाकलेल्या पहिल्याच षटकात क्विंटनने अफलातून झेल घेतला. वेंकटेश अय्यरला भोपळा न फोडू देताच माघारी पाठवले.
लोकेश राहुल ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने KKR विरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या दोघांमुळे LSG ने एकही विकेट न गमावता २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. LSG ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने १२ धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याचा फटका त्यांना बसला. क्विंटन व लोकेश यांनी संपूर्ण २० षटके खेळून विक्रमांची नोंद केली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर, तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. लखनौने २१० धावा केल्या.
प्रत्युत्तरात KKRची सुरुवात निराशाजनकच झाली. मोहसिन खानने पहिल्याच षटकात KKRचा ओपनर वेंकटेश अय्यरला ( ०) बाद केले. क्विंटन डी कॉकने अफलातून झेल घेतला. त्यानंतर तिसऱ्या षटकात मोहसिनने LSGला दुसरे यश मिळवून देताना अभिजित तोमरची ( ४) विकेट घेतली. २ बाद ९ अशा अवस्थेत असणाऱ्या KKRला नितिश राणा व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सावरले. या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. नितिशने २२ चेंडूंत ९ चौकारांसह ४२ धावा कुटल्या आणि श्रेयससह तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. के गौथमने ही जोडी तोडताना नितिशला बाद केले. त्यांतर अय्यरला सॅम बिलिंग्सने उत्तम साथ दिली. KKR ने १० षटकांत ३ बाद ९९ धावा केल्या.
पाहा क्विंटनने घेतलेला अफलातून झेल