IPL 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग 2022साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं तीन खेळाडूंना कायम राखल्याची चर्चा आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा बंगलोरची पहिली पसंती आहे. विराटनंही याच फ्रँचायझीसोबत कायम राहण्याचे अनेकदा बोलून दाखवले आहे. सुरुवातीपासून तो याच फ्रँचायझीकडून खेळतोय आणि तो संघाचा कर्णधारही आहे. पण, आयपीएल 2022साठी विराटला RCBच्या ताफ्यात कायम राहणे आर्थिक तोट्याचे ठरले आहे. RCBनं विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व मोहम्मद सिराज यांना कायम राखले आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार फ्रँचायझींना प्रत्येकी 4 खेळाडूंसाटी 42 कोटींचं बजेट ठरवण्यात आले आहे. त्यामुळे समजा RCBनं तीन खेळाडूंनाच कायम राखले तर प्रथम क्रमांकानुसार विराटला 15 कोटीच मिळतील, जर चार खेळाडू कायम राखले तर त्याला 16 कोटी मिळतील. मागच्या वेळेस जेव्हा RCBनं विराटला रिटेन केलं होतं तेव्हा फ्रँचायझीनं 17 कोटी रुपये मोजले होते. पण, आता त्याची किंमत वाढण्याएवजी कमी झाली आहे. ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी, तर सिराजला 7 कोटींत कायम राखले आहे.
कशी दिली जाणार रिटेन केलेल्या खेळाडूंना रक्कम?चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.
कोणला केलं रिलिज?युझवेंद्र चहल. देवदत्त पडिक्कल, अक्षदीप नाथ, रजत पाटीदार, सुयश एस प्रभुदेसाई, सचिन बेबी, केएस भारत, फिन अॅलन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, पवन देशपांडे, डॅनियल सॅम्स, जॉर्ज गार्टन, डेन ख्रिस्टीयन, हर्षल पटेल, स्कॉट कुगलेइजन, टिम डेविड, नवदीप सैनी, वानिंदु हसरंगा, कायले जेमिन्सन, केन रिचर्डसन, दुशमंथा चमीरा.