Salary of Commentators, IPL 2022: आयपीएल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच संघ कसून तयारी करत आहेत. स्पर्धेचे ब्रॉडकास्टर्सदेखील आपला कॉमेंट्रीचा तगडा संच घेऊन सज्ज असणार आहेत. यंदाच्या हंगामासाठी एकूण ८ भाषांमध्ये कॉमेंट्री होणार असून त्यासाठी जवळपास ८० जणांचा संच तयार करण्यात आला आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेसाठी अनुभवी, जुने-जाणते तसेच काही नवोदित व प्रतिभावान असे कॉमेंटेटर सज्ज आहेत. हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सुरेश रैना, आकाश चोप्रा, इरफान पठान असे अनेक दिग्गज लोक यंदा कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिसणार आहेत.
एका अहवालानुसार, आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना कोट्यवधींच्या घरात मानधन दिलं जातं. इंग्रजी भाषेतील कॉमेंट्री (English Commentators) टीम सर्वाधिक पैसे घेते. कारण त्यांना जगभर ऐकलं जातं. त्या खालोखाल हिंदी (Hindi commentators) तर सर्वात कमी मानधन हे स्थानिक (Regional Commentators) भाषांतील कॉमेंट्रीसाठी असते.
यंदाच्या हंगामासाठी कमीत कमी २ कोटी ते जास्तीत जास्त ७ कोटींपर्यंतचे मानधन कॉमेंट्री करणाऱ्यांना देण्यात आलं आहे. हर्षा भोगले, इयन बिशप, सुनील गावसकर, केविन पीटरसन, माइकल स्लेटर, साइमन डुल, डॅनी मॉरिसन यासारख्या अनुभवी कॉमेंटेटर्सना ५ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ३ कोटी ९० लाख रूपये मानधन दिलं जात आहे. मात्र मैदानात उभं राहून थेट डग आऊटमधून कॉमेंट्री (Dugout commentators) करत असणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजेच सुमारे ७ कोटी इतकं मानधन मिळतं. स्कॉट स्टायरिस, ग्रॅम स्वान यांसारख्यांचा यात समावेश होतो.
याशिवाय, हिंदी आणि स्थानिक भाषांतील कॉमेंटेटर्सना कमीत कमी ७० लाख ते जास्तीत जास्त अंदाजे 3 कोटी रुपये पगार दिला जातो. यामध्ये आकाश चोप्राला सर्वात जास्त ३.५० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे २ कोटी ६६ लाख इतका पगार मिळतो. तर इरफान पठान व इतर कॉमेंटेटर्सना अंदाजे २ कोटी ते २.५० कोटी या रेंजमध्ये मानधन दिलं जातं.
Web Title: IPL 2022 Salary of commentators from sunil gavaskar harsha bhogle aakash chopra suresh raina ravi shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.