Join us  

Controversial Decision?; IPL 2022 SRH vs RR Live : Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRH चा गंभीर आरोप, Video

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सच्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. पण, ही विकेट वादात अडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:00 PM

Open in App

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सच्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर SRHचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson ) याच्या बॅटची किनार घेत चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने गेला. पण, संजूच्या हातून तो चेंडू निसटला आणि स्लीपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलने ( Devdutta Padikkal) प्रसंगावधन दाखवताना चेंडू टिपला. तिसऱ्या अम्पायरने निर्णय राजस्थानच्या पक्षात दिला आणि हा निर्णय वादात अडकला. SRHने सोशल मीडियावर या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली.राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. जोस बटलर ( Jose Buttler )  व यशस्वी जैस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर संजू व देवदत्त पडिक्कल यांची फटकेबाजी सनरायझर्स हैदराबादसाठी ( Sunrisers Hyderabad ) डोकेदुखी ठरली. संजूने तर ८ चेंडूंत ४२ धावा चोपून RRला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. शिमरोन हेटमायरनेही तुफान फटकेबाजी करून राजस्थानची धावसंख्या दोनशेपार नेली. 

NO Ball मुळे जीवदान मिळालेल्या जोस बटलर व यशस्वी जैस्वाल SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी  ६ षटकांत ५८ धावा जोडल्या. यशस्वी ( २०) ७व्या षटकाच्या रोमारिओ शेफर्डच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बटलरने ३५ धावा केल्या.  कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) अन्  देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) यांनी धावांचा पाऊस पाडला आणि ४१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, संजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. शिमरोन हेटमायर व रियान पराग यांनीही हात साफ करताना RRला ६ बाद २१० धावांपर्यंत मजल मारून दिली. हेटमायरने १३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावा चोपल्या.   पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयपीएल २०२२केन विल्यमसनसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सदेवदत्त पडिक्कल
Open in App