IPL 2023 Controversy : विराटसोबतच्या वादानंतर Gautam Gambhirचं वादग्रस्त ट्विट; म्हणाला, दिल्लीतून पळून गेले 'भगोडे'...

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (LSG Vs RCB) यांच्यातल्या या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:53 PM2023-05-03T21:53:48+5:302023-05-03T22:00:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Controversy : Gautam Gambhir's Controversial Tweet After Argument With Virat Kohli; critisize on Rajat sharma comment  | IPL 2023 Controversy : विराटसोबतच्या वादानंतर Gautam Gambhirचं वादग्रस्त ट्विट; म्हणाला, दिल्लीतून पळून गेले 'भगोडे'...

IPL 2023 Controversy : विराटसोबतच्या वादानंतर Gautam Gambhirचं वादग्रस्त ट्विट; म्हणाला, दिल्लीतून पळून गेले 'भगोडे'...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Controversy Gautam Gambhir vs Virat Kohli & Rajat Sharma : आयपीएल २०२३ चा ४३ वा सामना हा सर्वाधिक चर्चेत राहिला. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (LSG Vs RCB) यांच्यातल्या या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. त्यात पत्रकार रजत शर्मा यांनीही उडी घेतली आणि त्यांनी गौतम गंभीरला सुनावले.


LSG vs RCB सामन्यानंतर कायले मायर्स विराटसोबत गप्पा मारत असताना तेथे गंभीर आला अन् LSGच्या फलंदाजाला घेऊन गेला. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असताना LSGचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले. हा वाद पाहताच गौतम गंभीर पुन्हा आक्रमक पवित्र्यात गेला अन् दूरूनच विराटवर खवळला. लोकेश राहुलसह लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विराटपर्यंत पोहोचला.  त्यानंतरही विराट शांततेने त्याच्याशी बोलताना दिसला, परंतु गंभीरचा पारा चढाच होता. पण खरं भांडण जेव्हा नवीन बाद होऊन माघारी जात होता तेव्हाच सुरू झालं होतं.. विराट त्याला काहीतरी म्हणाला होता.


या वादावर रजत शर्मा म्हणाले, “माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणूक लढवून खासदार झाला आहे, अशा परिस्थितीत त्याची भावना आणखीनच वाढली आहे. विराट कोहलीची लोकप्रियता त्याला खूप त्रास देत आहे.अशा घटनांमुळे क्रिकेटचे नुकसान होते आणि तसे व्हायला नको होते.''



रजत शर्मा यांना लखनौचा मेंटॉर व माजी सलामीवीर गौतम गंभीरने ट्विट करून उत्तर दिले. त्याने लिहिले की, ''Man who ran away from Delhi Cricket citing “pressure” seems over eager to sell paid PR as concern for cricket! यही कलयुग़ है जहां ‘भगोड़े’ अपनी ‘अदालत’ चलाते हैं।''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023 Controversy : Gautam Gambhir's Controversial Tweet After Argument With Virat Kohli; critisize on Rajat sharma comment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.