IPL 2023, PBKS vs MI Live : अमरावतीच्या पोरानं मुंबई इंडियन्सला बेक्कार चोपले, लिएम लिव्हिंगस्टोननेही हात धुऊन घेतले

IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने पियूष चावलाच्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:03 PM2023-05-03T21:03:42+5:302023-05-03T21:16:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, PBKS vs MI Live Marathi : Liam Livingstone - 82*(42), Jitesh Sharma - 49*(27), Partnership - 119*(53)What a batting performance by Liam Livingstone & Jitesh Sharma. Punjab post 214/3 total. | IPL 2023, PBKS vs MI Live : अमरावतीच्या पोरानं मुंबई इंडियन्सला बेक्कार चोपले, लिएम लिव्हिंगस्टोननेही हात धुऊन घेतले

IPL 2023, PBKS vs MI Live : अमरावतीच्या पोरानं मुंबई इंडियन्सला बेक्कार चोपले, लिएम लिव्हिंगस्टोननेही हात धुऊन घेतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने पियूष चावलाच्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. PBKS च्या जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी MIच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. अमरावतीचा जितेश ( Jitesh Sharma) २०१८मध्ये मुंबई इंडियन्सचाच सदस्य होता, परंतु त्याला संधी मिळाली नव्हती. आज त्याने त्याच संघाविरुद्ध वादळी खेळी केली. लिव्हिंगस्टोनने जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी केली. MIचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) आज सपशेल अपयशी ठरला आणि रोहित शर्मासाठी ही खूप मोठी डोकेदुखी बनली.

MIचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शद खानने त्याच्या पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंगला ( ९) यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. शिखऱ धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. MIचा यशस्वी गोलंदाज पियूष चावलाला गब्बरने चांगले झोडले होते, परंतु त्यानेच शिखरची विकेट घेतली. २० चेंडूंत ३० धावा करून शिखर यष्टिचीत झाला. या विकेटसह पियूषने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये लसिथ मलिंगाला ( १७०) मागे टाकून चौथे स्थान पटकावले. त्याने MIसाठी डोकेदुखी ठरलेल्या मॅथ्यू शॉर्टचा त्रिफळा उडवताना आयपीएलमध्ये १७२ विकेट्स पूर्ण केल्या आणि अमित मिश्राशी बरोबरी केली. शॉर्ट २७ धावांवर बाद झाला. पियूषने आज २९ धावांत २ विकेट्स घेतल्या.


लिएम लिव्हिंगस्टन आणि जितेश शर्मा यांच्यावर आता धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी होती. मुंबईच्या गोलंदाजांचा मारा चांगला सुरू होता, परंतु जितेशने त्याचा आक्रमक पवित्रा कायम राखताना अधूनमधून चेंडू उत्तुंग टोलावले. जितेशने चौथ्या विकेटसाठी लिव्हिंगस्टोनसह २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात त्याच्या ११ चेंडूंत २४ धावांचा समावेश होता. या दोघांनी अखेरच्या षटकांत १३-१४च्या सरासरीने धावा करताना दिसले अन् लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जोफ्रा आर्चर आज पूर्णपणे अपयशी ठरला अन् लिव्हिंगस्टोनने त्याच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचले. १९व्या षटकात त्याने सलग तीन सिक्स मारून जितेशसह ४६ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. आर्चरच्या त्या षटकात २७ धावा आल्या आणि त्याची स्पेल ४-०-५६-० अशी बिघडली. आकाश मढवालने शेवटचे षटक तुलनेने छान टाकली. त्याने ९ धावा दिल्या आणि पंजाबने ३ बाद २१४ धावा केल्या. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी केली.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: IPL 2023, PBKS vs MI Live Marathi : Liam Livingstone - 82*(42), Jitesh Sharma - 49*(27), Partnership - 119*(53)What a batting performance by Liam Livingstone & Jitesh Sharma. Punjab post 214/3 total.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.