IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. पंजाब किंग्सच्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DCला डेव्हिड वॉर्नर व फिल सॉल्ट यांनी ३८ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी करून दिली. पण, हरप्रीत ब्रार व राहुल चहर यांनी फिरकीच्या तालावर दिल्लीच्या फलंदाजांना नाचवले. या दोघांनी ४६ धावांत ६ विकेट्स घेताना बिनबाद ६९ वरून DCची अवस्था ६ बाद ८८ अशी दयनीय केली. त्यानंतर दिल्लीला डोकं वर काढताच आले नाही आणि त्यांच्या प्ले ऑफच्या आशा मावळल्या.
डेव्हिड वॉर्नरने DCला आक्रमक सुरूवात करून दिली आणि त्याने फिल सॉल्टसह ६९ धावांची भागीदारी करून दिली. पण, हरप्रीत ब्रारने सातव्या षटकात फिल सॉल्टचा ( २१) त्रिफळा उडवला अन् PBKSच्या फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला. मिचेल मार्श ( ३), रायली रूसो ( ५), अक्षर पटेल ( १) आणि मनीष पांडे ( ०) हे झटपट माघारी परतले. हरप्रीत ब्रार व राहुल चहर यांनी दिल्लीला धक्क्यांमागून धक्के दिले. बिनबाद ६९ वरून DCची अवस्था ६ बाद ८८ अशी दयनीय झाली. वॉर्नर २७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. हरप्रीतने ४-०-३०-४ अशी, तर चहरने ४-०-१६-२ अशी उल्लेखनीय स्पेल टाकली.
दिल्लीचा पराभव निश्चित झाला होता. अमन खान ( १६) व प्रविण दुबे यांनी काही फटके मारून आशा जागवल्या, परंतु नॅथन एलिसने ही जोडी तोडली. एलिसने अप्रतिम चेंडूवर दुबेचा ( १६) त्रिफळा उडवला. दिल्लीला २० षटकांत ८ बाद १३६ धावा केल्या आणि पंजाबने ३१ धावांनी सामना जिंकला. दिल्लीचा हा १२व्या सामन्यातील आठवा पराभव ठरला अन् त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले. पंजाब किंग्सने आजच्या विजयासह खात्यातील गुणसंख्या १२ केली व सहाव्या क्रमांकावर झेल घेतली. राजस्थान रॉयल्सच्या खात्यातही १२ गुण आहेत. गुजरात टायटन्स ( १६), चेन्नई सुपर किंग्स ( १५), मुंबई इंडियन्स ( १४) व लखनौ सुपर जायंट्स ( १३) हे आघाडीवर आहेत.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
कृणाल पांड्याचे २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video
SRH च्या चाहत्यांनी LSGच्या डग आऊटवर काहीतरी फेकले, कोहलीचे नारे दिले; फुल राडा
१९ धावांत ६ बाद! दिल्ली कॅपिटल्स रडकुंडीला आले, हरप्रीत ब्रारने ४ धक्के दिले
तत्पूर्वी, फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर प्रभसिमरन सिंगने ६५ चेंडूंत १०३ धावा केल्या. शिखर धवन ( ७), लिएम लिव्हिंगस्टोन ( ४), जितेश शर्मा ( ५) माघारी परतल्यानंतर प्रभसिमरन आणि सॅम कुरन ( २०) यांनी ७२ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरनने ६५ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांसह १०३ धावा केल्या. सिकंदर रजा (११) व शाहरुख खान ( २) यांनी अखेरच्या षटकात पंजाबच्या धावसंख्येत भर घातली अन् सघाला ७ बाद १६७ धावा केल्या. पंजाबच्या अन्य फलंदाजांनी ५५ चेंडूंत ५१ धावा केल्या आणि १३ अवांतर धावा मिळाल्या.
Web Title: IPL 2023 Playoffs Scenario, PBKS vs DC Live Marathi : Prabhsimran Singh - 103(65), HARPREET BRAR (4-0-30-4), Rahul Chahar (4-0-16-2), Punjab Kings beat Delhi Capitals by 31 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.