IPL 2023 Play Offs Scenario : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आजचा रविवार अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्यातील निकालानंतर प्ले ऑफचे चित्र जवळपास निश्चित होईल, पण निकाल विरोधात गेल्यास काय? राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दुपारचा सामना आहे. RR १२ गुणांसह पाचव्या आणि RCB १० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. RCBचा आजचा १२वा सामना आहे आणि RRपेक्षा ते एक लढत कमीच खेळले आहेत. त्यामुळे आजचा विजय RCBला १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत पुढे घेऊन जाणारा ठरेल. पण, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना खूप महत्त्वाचा आहे. CSK आज हरली तर त्यांचा पुढील प्रवास कसा असेल आणि KKRला विजयाचा किती फायदा होईल हे जाणून घेऊया...
चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास?
गुजरात टायटन्स ( १६), चेन्नई सुपर किंग्स ( १५), मुंबई इंडियन्स ( १४) व लखनौ सुपर जायंट्स ( १३) हे आघाडीवर आहेत. चेन्नई सुपर किंग्सचे दोन सामने ( वि. KKR आणि वि. DC) शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकून तेही क्वालिफायर १ च्या स्पर्धेत स्वतःला कायम राखण्याच्या प्रयत्नात आहेत. CSK हे दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी झाल्यास ते क्वालिफायर १ साठी पात्र ठरतील. आज जिंकल्यास CSK प्ले ऑफमध्ये पात्र ठरणारा पहिल्या संघाचा मान पटकावतील. पण, दोन्ही सामने गमावल्यास त्यांना RCB, RR, PBKS यांच्या किमान एका पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
IPL 2023 Playoffs Scenario : १० मधून २ गेले, ८ राहीले! प्ले ऑफच्या शर्यतीचे गणित अधिक चुरशीचे झाले
BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'
कोलकाता नाइट रायडर्स जिंकल्यास?
१२ सामन्यांत १० गुण मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला उर्वरित दोन्ही सामन्यांत चेन्नई व लखनौ यांच्यावर विजय मिळवावा लागेल. त्यांचे १४ गुण होतील, परंतु त्यानंतर त्यांना RRचा RCB कडून, हैदराबादचा गुजरात टायटन्सकडून, लखनौचा मुंबई इंडियन्सकडून, पंजाब किंग्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून, RCBचा सनरायझर्स हैदराबादकडून, राजस्थानचा पंजाबकडून आणि RCBचा गुजरातकडून पराभव अशा निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. असे झाल्यास पंजाब व कोलकाता यांचे प्रत्येकी १४ गुण होतील आणि त्यानंतर नेट रन रेटवर गणित असेल. त्यामुळे आज जरी कोलकाता जिंकले तरी CSK नेट रन रेट चांगला ठेवून बाजीगर ठरू शकतात.
Web Title: IPL 2023 Qualification Scenario of Chennai Super Kings & KKR's realistic qualification scenario
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.