IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला

पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्सला नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाट्यमय लढतीत पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:43 PM2024-04-04T23:43:14+5:302024-04-04T23:43:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - From all the auction drama to a super run-chase, SHASHANK SINGH THE HERO OF PBKS, punjab became a Most successful team to chases 200 or more run in IPL history | IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला

IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्सला नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाट्यमय लढतीत पराभूत केले. GT vs PBKS लढतीत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. यजमान गुजरातने १९९ धावांचा डोंगर उभा केला होता आणि पंजाबचे स्टार फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे गुजरात सहज जिंकेल असेल वाटले होते, परंतु शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा ( इम्पॅक्ट खेळाडू) या युवकांनी GT चा तोंडचा घास पळवला. या सामन्यात अर्धशतकी खेळी करून हिरो ठरलेल्या Shashank Singh याला IPL 2024 Auction मध्ये नाकारण्याचा प्रयत्न झाला होता. 


गुजरात टायटन्सने ४ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. शुबमन गिलने ४८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८९ धावा केल्या. त्यानंतर  साई सुदर्शनने १९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावा आणि राहुल तेवाटीयाने ८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २३ धावा केल्या. पंजाबचा कर्णधार शिखर धवन ( १) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. जॉनी बेअरस्टो ( २२), प्रभसिमरन सिंग ( ३५)  यांना नूर अहमदने बाद करून पंजाबला बॅकफूटवर फेकले.

सॅम कुरन ( ५), सिकंदर रजा ( १५) व जितेश शर्मा ( १६)  हेही अपयशी ठरले. पण, शशांक सिंग व इम्पॅक्ट खेळाडू आशुतोष शर्माने मॅच फिरवली, दोघांनी  २२ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. आशुतोष १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३१ धावांवर बाद झाला. शशांकने २९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह नाबाद ६१ धावा करून संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. 

  • १९ डिसेंबर २०२३ मध्ये पंजाब किंग्से ऑक्शनमध्ये निवडलेला शशांक सिंग हा आम्हाला हवा असलेला शशांक नसल्याचा दावा केला होता आणि त्यांनी ऑक्शनरला तसे पटवून देण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण, अखेर पंजाबने याच शशांक सिंगला आपल्या संघात घेतले. त्यावेळी पहिल्यांचा शशांक सिंग चुकीच्या कारणाने चर्चेत आला होता. पण, आज तोच शशांक पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. 
  • आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० किवा त्याहून अधिक लक्ष्यांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा मान पंजाब किंग्सने ( ६) पटकावला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा ( ५) विक्रम मोडला.  

Web Title: IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - From all the auction drama to a super run-chase, SHASHANK SINGH THE HERO OF PBKS, punjab became a Most successful team to chases 200 or more run in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.