IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: विराट कोहलीची झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेल्या किंग कोहलीला पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये दिसत आहेत. (IPL 2024 Live) सध्या आयपीएलचा थरार रंगला असून किंग कोहली यामाध्यमातून चाहत्यांशी जोडला गेला आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (PBKS vs RCB) यांच्यात होत आहे. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. खरं तर आरसीबी यंदाच्या हंगामातील दुसराच सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. पंजाब आणि बंगळुरू यांच्यात चिन्नस्वामी स्टेडियमवर लढत होत आहे. (Virat Kohli Video)
पंजाबने आरसीबीला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाकडून किंग कोहलीने चमक दाखवली. त्याने सुरुवातीपासून चांगली खेळी केली. त्याचा एक झेल सुटल्याने पंजाबला चांगला फटका बसला. दरम्यान, सामन्यादरम्यान विराटचा एक चाहता मैदानात आला अन् त्याने थेट विराटच्या दिशेने कूच केली. आपल्या आवडत्या खेळाडूला भेटून त्याने विराटचे पाय पकडले. मग सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी करून संबंधित चाहत्याला बाहेर नेले. पण, यावेळी विराटच्या एका कृतीने मन जिंकले. चाहत्याला विराटने मिठी मारण्याची संधी दिली. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नाणेफेक जिंकून यजमान आरसीबीने पाहुण्या पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबला जॉनी बेअरस्टोच्या रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मोर्चा सांभाळला. त्याने सावध खेळी करत डाव पुढे नेला, ज्याला सिमरन सिंगने साथ दिली. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो (८), सिमरन सिंग (२५), लियाम लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्माने (२७) धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या.
पंजाब किंग्जचा संघ -शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
बंगळुरूचा संघ -फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.