मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते...! हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर हे काय बोलून गेला MIचा स्टार?

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 06:32 PM2024-03-31T18:32:13+5:302024-03-31T18:32:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Spectator behaviour is beyond our control but I am hoping that the loyal Mumbai Indians fans will come to Wankhede and support us, says Piyush Chawla | मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते...! हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर हे काय बोलून गेला MIचा स्टार?

मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते...! हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर हे काय बोलून गेला MIचा स्टार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians Loyal Fans : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्स सध्या दोन पराभवांमुळे तालिकेत दहाव्या क्रमांकावर आहेत आणि उद्या ते यंदाच्या पर्वातील घरच्या मैदानावरील पहिला सामना खेळणार आहे. रोहित शर्माकडून ( Rohit Sharma) नेतृत्व काढून घेतल्याचा रोष MI ला सहन करावा लागला. गुजरात आणि हैदराबाद येथे झालेल्या दोन्ही सामन्यांत हार्दिकवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्यावर शेरेबाजी केली आणि आता तर वानखेडे स्टेडियमवरही असेच चित्र पाहायला मिळू शकते, अशी भीती फ्रँचायझीला आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशननं स्पष्ट केली भूमिका; 'त्या' वृत्तावर जाहीर केलं अधिकृत स्टेटमेंट


हार्दिक पांड्या मैदानावर आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली... त्यांनी एकसुराने हार्दिकच्या नेतृत्वाला नापसंती दर्शवली. त्यात वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या पर्वातील पहिलाच सामना उद्या होणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत हार्दिकला मुंबईच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. यासंदर्भातील प्रश्न आज सामन्याच्या पूर्वसंध्येला विचारला गेला आणि त्यावर ट्रेंट बोल्ट व पीयुष चावला यांनी त्यांची मत मांडली. हार्दिक पांड्यावरील प्रेक्षकांचा रोष फारकाळ राहणार नाही, असा विश्वास ट्रेंट बोल्टने व्यक्त केला.  


पीयुष चावला म्हणाला, ''प्रेक्षकांनी कसे वागावे, हे आपल्या हातात नाही. तुम्ही चाहत्यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. हार्दिक पांड्या ज्या प्रकारे या परिस्थितीला सामोरे जातोय आणि तो प्रेक्षकांच्या वागण्याचा फार विचार करत नाही. काहीवेळेस चाहत्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करावे लागते. ते ज्याप्रकारे वागत आहेत, ते योग्य दिसत नसले तरी त्यावर तुमचे नियंत्रण नाही. आमचे सामन्यावर लक्ष आहे आणि बाहेरील टीकेचा फार विचार करत नाही.''


 ''मला आशा आहे की, उद्या जेव्हा आम्ही येऊ तेव्हा प्रेक्षक आम्हाला साथ देतील. विशेषत: आमचे मागील दोन सामने ज्या प्रकारे झाले. मला वाटते की मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते आम्हाला साथ देतील,''असे चावला म्हणाला.  

Web Title: IPL 2024 : Spectator behaviour is beyond our control but I am hoping that the loyal Mumbai Indians fans will come to Wankhede and support us, says Piyush Chawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.