IPL 2024 Mumbai Indians Loyal Fans : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्स सध्या दोन पराभवांमुळे तालिकेत दहाव्या क्रमांकावर आहेत आणि उद्या ते यंदाच्या पर्वातील घरच्या मैदानावरील पहिला सामना खेळणार आहे. रोहित शर्माकडून ( Rohit Sharma) नेतृत्व काढून घेतल्याचा रोष MI ला सहन करावा लागला. गुजरात आणि हैदराबाद येथे झालेल्या दोन्ही सामन्यांत हार्दिकवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्यावर शेरेबाजी केली आणि आता तर वानखेडे स्टेडियमवरही असेच चित्र पाहायला मिळू शकते, अशी भीती फ्रँचायझीला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशननं स्पष्ट केली भूमिका; 'त्या' वृत्तावर जाहीर केलं अधिकृत स्टेटमेंट
हार्दिक पांड्या मैदानावर आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली... त्यांनी एकसुराने हार्दिकच्या नेतृत्वाला नापसंती दर्शवली. त्यात वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या पर्वातील पहिलाच सामना उद्या होणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत हार्दिकला मुंबईच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. यासंदर्भातील प्रश्न आज सामन्याच्या पूर्वसंध्येला विचारला गेला आणि त्यावर ट्रेंट बोल्ट व पीयुष चावला यांनी त्यांची मत मांडली. हार्दिक पांड्यावरील प्रेक्षकांचा रोष फारकाळ राहणार नाही, असा विश्वास ट्रेंट बोल्टने व्यक्त केला.
''मला आशा आहे की, उद्या जेव्हा आम्ही येऊ तेव्हा प्रेक्षक आम्हाला साथ देतील. विशेषत: आमचे मागील दोन सामने ज्या प्रकारे झाले. मला वाटते की मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते आम्हाला साथ देतील,''असे चावला म्हणाला.